संजय लीला भन्साळीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाला २२ वर्षे पूर्ण; खास निमित्ताने अजय देवगणची खास पोस्ट व्हायरल


बॉलिवूडमध्ये एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट बनले आहेत. यातील एक सुपरहिट चित्रपट म्हणजे संजय लीला भन्साळी यांचा ‘हम दिल दे चुके सनम.’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अजय देवगण यांनी मुख्य पात्र निभावले होते. या चित्रपटाला आज १८ जूनला २२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अजय देवगणने खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो, ऐश्वर्या राय, संजय लीला भन्साळी आणि सलमान खान सोबत दिसत आहे.

अजय देवगणने हे फोटो शेअर करून लिहिले आहे की, “आज दिल दे चुके सनम या चित्रपटाला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. सलमान, संजय, ऐश आणि मला हे माहीत होते की, आम्ही एक सुपर सेन्सिटिव्ह चित्रपट बनवत आहोत. परंतु तेव्हा आम्हाला हे माहीत नव्हते की, हा चित्रपट इतिहास रचणार आहे.”

हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवरच सुपरहिट ठरला नाही, तर अनेकजण हा चित्रपट पाहून चकितही झाले होते. कारण तेव्हा ही पहिली वेळ होती जेव्हा सर्वांनी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाची भव्यता पहिली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २२ वर्षानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडीचा आहे.

या चित्रपटात सलमान, ऐश्वर्या आणि अजयने शानदार अभिनय केला होता. या चित्रपटात प्रेक्षकांना समीरची मस्ती आणि स्टाईल, नंदिनीची निरागसता आणि सौंदर्य आणि वनराजचे प्रेम पाहायला मिळाले होते. संजय लीला भन्साळी यांनी प्रत्येक पात्र उत्तम रीतीने रेखाटले होते. (Sanjay lila Bhansali’s hum dil de chuke Sanam movie complete 22 years)

या चित्रपटातील संगीत देखील एक वेगळेच होते. चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात. या प्रकारचे संगीत बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच आले होते. या चित्रपटातील ‘ढोली तारो’, ‘निंबुडा’, ‘झोका हवा का’ आणि ‘तडप तडप’ या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

या चित्रपटात गुजराती आणि संस्कृत भाषेचा समावेश आहे. चित्रपटातील प्रेम काहणी, तुटलेले हृदय, परिवारासाठी नंदिनीने दिलेली प्रेमाची आहुती या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना खूप भावल्या होत्या. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘शेरनी’ बनलेल्या विद्याचा परफॉर्मन्स पाहून प्रभावित झाले प्रेक्षक; सोशल मीडियावर बांधले जातायेत अभिनेत्रीच्या कौतुकांचे पूल

-नोहा फतेहीने विचित्र अंदाजात घातली बिकिनी; अभिनेत्रीला पाहून वरुण धवनही झाला लोटपोट

-अरर!! ड्रेस एवढा गच्च होतोय की उर्वशी रौतेलाला बसायला देखील होतोय त्रास, एका सेशनमध्ये उडाली फजिती


Leave A Reply

Your email address will not be published.