Monday, June 24, 2024

साराच्या सिक्युरिटी गार्डने पॅपराजीसोबत केले ‘असे’ काही की, संतापली अभिनेत्री; माफी मागत जिंकली मने

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सध्या तिच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचा मुंबईमध्ये ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर सारा अली खान तिच्या गाडीने जेव्हा घरी येत होती, तेव्हा असा काही प्रसंग घडला, ज्यामुळे तिला खूपच राग आला. यानंतर तिने पऍपराजींची माफी देखील मागितली.

सारा जेव्हा हा कार्यक्रम संपवून आली, तेव्हा पॅपराजींनी तिला चहूबाजूंनी घेरले. सारा जेव्हा तिच्या गाडीकडे जात होती, तेव्हा तिच्या एका सिक्युरिटी गार्डने पॅपराजीला धक्का मारला. यानंतर ती खूपच नाराज झाली. ती लगेच तिथे आली आणि पॅपराजींची माफी मागितली. तसेच तिने तिच्या सिक्युरिटी गार्डला देखील त्याची माफी मागायला सांगितली. (Sara Ali Khan angry at a security guard who pushed Paparazzi)

सारा अली खानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, “कुठे आहेत ते? त्यांनी तुम्हाला खाली पाडले का? त्यांना प्लीज सॉरी बोला. तुम्ही असे करू नका. तुम्ही असा कोणालाही धक्का देत शकत नाही.” यानंतर ती पॅपराजींना देखील सॉरी म्हणते आणि गाडीत बसते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर तिच्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तिच्या या स्वभावाचे तिचे चाहते खूपच कौतुक करत आहेत.

अनेक कलाकार देखील पॅपराजींना असे धक्के मारत किंवा दुर्लक्ष करत निघून जात असतात, परंतु आता साराच्या या वागण्याने तिने सगळ्यांचे मन जिंकून घेतले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक चालाले आहे.

सारा अली खानच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रॉय यांनी केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत धनुष आणि अक्षय कुमार आहेत. धनुषने याआधी ‘रांझना’ या चित्रपटात आनंद एल रॉय यांच्यासोबत काम केले आहे. त्यांचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी डिझनी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इमरान हाश्मीच्या ‘लुट गए’ गाण्याची क्रेझ आफ्रिकेतही, ‘या’ जोडप्याने गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल

-भयावह! ‘छोरी’ फेम नुसरतसोबत घडली विचित्र घटना, ३० सेकंदात सोडावं लागलं अभिनेत्रीला हॉटेल

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

हे देखील वाचा