ऐकलंत का? सारा अली खानने गुपचूप उरकलं लग्न? न पाहिलेले फोटो आले समोर


सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे आजकाल सर्वचजण सक्रिय राहणे पसंत करतात. यामुळे प्रसिद्ध कलाकारांचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होणे हे काही नवीन नाहीये. मात्र कधीकधी काही कलाकारांचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामुळे ते चर्चेत येतात. नुकतेच ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसलेल्या सारा अली खानसोबतही (Sara Ali Khan) असेच काहीसे घडले. सोशल मीडियावर साराने भांगेत सिंदूर लावल्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे. तो प्रश्न आहे की, अभिनेत्रीने खरोखरच गुपचूप लग्न केले आहे का?

भांगेत पाहायला मिळाले सिंदूर
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सारा अली खानच्या फोटोमध्ये, ती भांगेत सिंदूर लावलेल्या नवीन वधूसारखी दिसत आहे. हा फोटो पाहून अभिनेत्रीने गुपचूप लग्न केल्याच्या अफवा पसरत आहेत. जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर तुम्हाला या फोटोची सत्यता कळायला हवी. (sara ali khan secret wedding picture viral with vicky kaushal)

विकी कौशलही दिसला सोबत
या व्हायरल फोटोमध्ये सारा अली खानसोबत विकी कौशलही दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये दोघेही अशा प्रकारे एकत्र उभे आहेत की, जणू काय दोघे पती-पत्नी आहेत. यासोबतच या दोन कलाकारांशिवाय आणखी एक व्यक्तीही या फोटोमध्ये दिसत आहे.

फॅनपेजने शेअर केला फोटो
हा फोटो सोशल मीडियावर तेव्हा चर्चेत आला, जेव्हा एका चाहत्याने तो मनोरंजक कॅप्शनसह शेअर केला. फॅनने कॅप्शनमध्ये लिहिले, “फोटोमध्ये सारा आणि विकी कपलसारखे दिसत आहेत.” या फोटोमध्ये साराने हिरव्या रंगाची प्रिंटेड ओढणी परिधान केलेली दिसत आहे, तर विकीने निळ्या रंगाच्या टी-शर्टसह लाल रंगाचे जॅकेट घातलेले दिसले आहे.

‘लुका छुपी २’ असू शकतो चित्रपट
सारा अली खान आणि विकी कौशलचा हा व्हायरल झालेला फोटो त्यांच्या आगामी चित्रपटासारखा दिसत आहे. सारा आणि विकी लक्ष्मण उत्रेकर यांच्या ‘लुका छुपी पार्ट २’ या चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत.  अशामध्ये, हा फोटो या चित्रपटाच्या सेटवरील असू शकतो. मात्र, या चित्रपटाबाबत किंवा हा व्हायरल झालेला फोटो कोणत्या चित्रपटाचा आहे याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!