ठरलं तर! सुपरस्टार धनुषचा ‘कर्णन’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

South superstar Dhanush starrer karnan to release on digital platform


दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार धनुष याचे चाहते संपूर्ण भारतात आहेतच, परंतु याव्यतिरिक्त परदेशातही त्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. बॉक्स ऑफिसवर त्याचे सगळेच चित्रपट धमाल करून जातात. त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे धनुषचा बहुप्रतिक्षित ‘कर्णन’ हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणार आहे. त्याचा हा चित्रपट 14 मे ला ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट 9 एप्रिल 2021 ला‌ चित्रपटगृहात प्रदर्शित केला होता. कोरोनाचे निर्बंध असून देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. यानंतर याचे डिजिटल अधिकार ऍमेझॉन प्राईम व्हिडिओने खरेदी केले आहेत.

मारी सेल्वराज यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘कर्णन’ या चित्रपटात धनुषसोब लालबाबू, नटराजन, सुब्रमण्यम योगीबाबू यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. परंतु या चित्रपटात सर्वांच्या नजरा केवळ धनुषवर खिळल्या आहेत. धनुषने पुन्हा एकदा या चित्रपटात शानदार अभिनय करून सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. हा एक ऍक्शन ड्रामा चित्रपट आहे.

याआधी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओचा अधिकृत यूट्यूब चॅनलवर या चित्रपटाचा टिजर प्रदर्शित केला होता. तो प्रदर्शित होता क्षणीच व्हायरल झाला होता. यानंतर प्रेक्षकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाची ओढ निर्माण झाली होती. कोरोना महामारीमुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांना बघता आला नव्हता. त्यामुळे सगळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहेत.

ऍक्शन ड्रामा असलेला हा चित्रपट एका बहादुर तरुण कर्णनच्या जीवनावर आधारित आहे. जो त्याच्या गावात लोकांच्या अधिकारासाठी लढत असतो. या कहाणीमध्ये त्याचा संघर्ष, त्याच्या सोबत होणारा अन्याय, जातीवादाविरुद्ध त्याची लढाई या सगळ्याचे वर्णन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…


Leave A Reply

Your email address will not be published.