हत्या की आत्महत्या? बच्चनला सुपस्टार करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीच्या मृत्यू बनून राहिला एक रहस्य


बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्म मेकर मनमोहन देसाई यांनी जवळपास 20 पेक्षाही जास्त चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. त्यातील बरेच चित्रपट सुपरहिट झाले आहेत. 26 फेब्रुवारी 1937 मध्ये मनमोहन यांचा जन्म झाला होता. त्यांच्या काळात त्यांनी खूप नाव कमवले. त्यानी अनेक कमर्शिअल चित्रपट बनवले आहे. परंतु 1994 मध्ये झालेल्या त्यांच्या मृत्युने संपूर्ण चित्रपट सृष्टीवर दुःखाचे सावट पसरले होते.

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई यांचा मृत्यू त्यांच्या बालकनीमधून खाली पडल्यामुळे झाला होता. त्यावेळेस सगळीकडे अशी देखील बातमी पसरली होती की, त्यांनी आत्महत्या केली. अनेकांचे असे म्हणणे होते की, त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप गेले. तसेच त्यांना पाठीचा देखील आजार होता. म्हणून कदाचित त्यांनी हे पाऊल उचलले असावे.

परंतु संपूर्ण पुराव्यानुसार असे कोणीच सिद्ध करू शकले नाही की, त्यांनी आत्महत्या केली होती. तसेच काहींचे असे म्हणणे होते की, त्यांची हत्या झाली होती. परंतु या मृत्यूच्या चौकशीमध्ये पोलिसांना काहीच पुरावा मिळाला नाही आणि शेवटी पोलिसांनी ही केस बंद केली.

अभिनेता मनमोहन देसाई हे अभिनेत्री नंदावर खूप प्रेम करत होते. परंतु त्यांचं लग्न झाल्यामुळे त्यांनी त्यांचे प्रेम कधीही जाहीर नाही केले. देसाई यांच्या बायकोच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांचे प्रेम नंदा जवळ जाहीर केले होते. त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. परंतु कदाचित नियतीचा हे सगळं मान्य नव्हत आणि साखरपुड्याचे 2 वर्षांनंतर देसाई यांचा मृत्यू झाला. नंदा मात्र पुढे अविवाहितच राहिल्या.

मनमोहन देसाई यांच्या अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. त्यामुळेच बच्चन यांना करीअरमध्ये मोठी मजल मारता आली.


Leave A Reply

Your email address will not be published.