सिनेसृष्टीतली बिनधास्त अभिनेत्री म्हटलं की, डोळ्यासमोर सर्वात पहिला चेहरा येतो तो सई ताम्हणकरचा. तिने तिच्या बोल्ड ऍंड बिनधास्त अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. आज सई तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.
चित्रपटात आपल्याला सईच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या आहेत. मात्र नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्यांना तिची क्यूटनेस पाहायला मिळाली आहे. दरवेळी बोल्ड अंदाजात दिसणारी सई यावेळी गोंडस अशा अंदाजात दिसली आहे. वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यात ती अगदी लहान मुलांसारखे हावभाव देताना दिसली आहे.
या व्हिडिओमध्ये सई ‘दिल तो बच्चा है जी’ या गाण्यावर क्यूट एक्सप्रेशन्स देत आहेत. यातील तिचा लूक देखील खूपच गोंडस आहे. सईचा हा मजेदार अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. म्हणूनच या व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच ‘कलरफुल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच सई ताम्हणकर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे. यात तिच्यासोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित अभिनित ‘समांतर २’ या लोकप्रिय वेबसिरीजमध्येही झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हे करायला मी खूप घाबरायचे…’, म्हणत व्हिडिओमध्ये ‘तीच’ गोष्ट करताना दिसली ऋता दुर्गुळे
-हा नक्की फोटो आहे की व्हिडिओ? तेजस्विनी पंडितची लेटेस्ट पोस्ट पाहून चक्रावले नेटकरी