जेव्हा वेगवेगळ्या कलाकारांसोबत ऐश्वर्याने निभावली होती एकच भूमिका; पाहायला मिळाला अभिनेत्रीचा दिलकश अंदाज


बॉलिवूड दिग्दर्शक मनिरत्नम यांचा ‘रावण’ हा चित्रपट ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या करिअरमधील एक खास चित्रपट आहे. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्या दोघांच्याही अभिनयाचे खूप कौतुक झाले. हा चित्रपट ‘रावण’ या नावाने हिंदीमध्ये तर ‘रावनन’ या नावाने तमिळमध्ये प्रदर्शित झाला होता. तसेच मनिरत्नम यांनी वेगवेगळ्या भाषेत आणि वेगवेगळ्या कलाकारांसोबत शूटिंग केली होती. अशातच या चित्रपटातील एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये ऐश्वर्याच्या अदा तिच्या चाहत्यांना खूप आवडल्या आहेत.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय ही पृथ्वीराज सुकुमारन आणि विक्रमसोबत दिसत आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात तमिळमध्ये पृथ्वीराजने रामाचे आणि विक्रमने रावणाचे पात्र निभावले होते. हिंदीमध्ये रामाचे पात्र विक्रमने तर रावनाचे पात्र अभिषेक बच्चनने निभावले होते. यातील खास गोष्ट म्हणजे दोन्हीही भाषांमध्ये ऐश्वर्या सीतेच्या भूमिकेत होती.

सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये खास गोष्ट ही आहे की, ज्या गेटअपमध्ये विक्रम आणि ऐश्वर्या होते त्याच गेटअपमध्ये पृथ्वी आणि ऐश्वर्या दिसत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर ऐश्वर्याचा डान्स तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच पृथ्वी आणि विक्रमच्या भुमिकेला देखील खूप पसंत केले जात आहे.

ऐश्वर्या राय बच्चन ही २०१० साली ‘रावण’ या चित्रपटासोबतच आणखी चार चित्रपटात दिसली होती. यानंतर खूप मोठ्या ब्रेकनंतर तिने २०१५ साली ‘जज्बा’ या चित्रपटातून पुन्हा एकदा जोरदार एंट्री केली. यानंतर २०१६ ंसाली ती ‘सरबजीत’ आणि ‘यह दिल है मुश्किल’ या चित्रपटात दिसली. यानंतर ती ‘फन्ने खां’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत अनिल कपूर आणि राजकुमार राव हे होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार


Leave A Reply

Your email address will not be published.