Thursday, September 28, 2023

तमन्ना अन् विराट कोहली रिलेशनशिपमध्ये? दाेघांचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

तमन्ना भाटियाची गणना तामिळ आणि तेलुगू चित्रपट सृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. तमन्ना सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात. तमन्नाचे लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहित आहे का एके काळी तमन्नानाचे नाव विराट कोहलीसोबत जोडले गेले होते.

तमन्ना (Tamannaah Bhatia) सध्या भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबतच्या कथित नात्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. तमन्ना  आणि विराट कोहली एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते असे बोलल जाते. मात्र, आता तमन्नाने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तमन्ना  आणि विराट कोहली यांनी 2012 मध्ये एकत्र जाहिरात शूट केली होती. त्यानंतर असे बोलले जात होते की, दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. पण दोघेही खरोखरच रिलेशनशिपमध्ये आहेत का?

तमन्ना आणि विराट कोहली एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडिओमध्ये क्रिकेटर विराट अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. क्रिकेटर आणि अभिनेत्री दोघांचाही अप्रतिम दिसणारा हा व्हिडिओ जुन्या काळातील आहे. व्हिडिओमध्ये विराटच्या तमन्नासोबत फ्लर्टिंगच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, विराट आणि तमन्ना यांच्या व्हायरल व्हिडीओने चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली आणि त्यांनी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला टॅग करून कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्सचा बाजार भरवला आहे.

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “भाऊ अनुष्का भाभीकडेही जाऊ नये.” आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले का, “अनुष्का मॅडम क्या चल रहा है.” तर कोहलीचा या व्हिडिओतील अभिनय पाहून अनेकांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची विनंती सुद्धा केली आहे.

 यावर बोलताना तमन्ना म्हणाली की, “मी विराट कोहलीला फक्त 4 गोष्टी सांगितल्या, पण त्यानंतर आमची भेट झाली नाही. पण विराट कोहलीसोबत जाहिरात शूट करणे हा एक मजेदार अनुभव होता यात शंका नाही. पण माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक अभिनेत्यांपेक्षा तो उत्तम अभिनय करतो.” खरंतर तमन्नाने विराट कोहलीसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांना साफ नकार दिला होता. या अफवांमध्ये तथ्य नसल्याचे तिने सांगितले. (Video of Tamannaah Bhatia and Virat Kohli went viral on social media)

अधिक वाचा- 
संगीतसृष्टीवर शोककळा: संगीतजगतातील ‘या’ लोकप्रिय गायकाचे दुःखद निधन
‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिल्यानंंतर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया; म्हणला, ‘माझी आई आणि मावशी…’

हे देखील वाचा