कबड्डी खेळावर आधारीत साऊथ सुपरस्टार गोपीचंदच्या ‘सिटीमार’ सिनेमाचा दमदार टिझर रिलीझ


ऍक्शन स्टार म्हणून ओळखल्या तेलगू सिनेसृष्टीतील सुपरस्टार गोपीचंद याच्या आगामी ‘सीटीमार’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तमन्ना भाटिया आणि गोपीचंद यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा कबड्डी या खेळावर आधारित आहे.

या सिनेमात गोपीचंद एका कबड्डी कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात भरपूर ऍक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच हा टिझर इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन संपत नंदी यांनी केले आहे. या सिनेमात गोपीचंदने एका अग्रेसिव्ह कोचची भूमिका निभावली आहे.

या सिनेमात गोपीचंदची स्टाइल, त्याचा अंदाज, लुक आणि त्याची ऍक्शन भाव खाऊन जात आहे. दमदार संवाद, ऍक्शन आणि अभिनय यामुळे हा सिनेमा नक्कीच सुपरहिट होणार त्यात शंका नाही. मागील काही काळापासून गोपीचंद एका चांगल्या हिट सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. सीटीमार सिनेमाचा टिझर पाहून त्यांची प्रतीक्षा या सिनेमासोबत संपणार हे नक्की. हा सिनेमा येत्या २ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.