Thursday, May 14, 2026
Home टेलिव्हिजन ‘महाभारता’मधील कुंती आठवते? तिच्या कारकीर्दीतील संघर्षमय जीवण कहाणी घ्या जाणुन

‘महाभारता’मधील कुंती आठवते? तिच्या कारकीर्दीतील संघर्षमय जीवण कहाणी घ्या जाणुन

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर यातील कलाकार आता मोठे झाले आहेत. असाच बी. आर. चोप्रा (chopra)यांच्या ‘महाभारता’ मधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर एक अमिट छाप सोडली. असेच एक प्रभावी पात्र होते पांडवांची आई कुंती, जिची भूमिका अभिनेत्री नाझनीन यांनी मोठ्या सहजतेने आणि गांभीर्याने साकारली होती. 

या मालिकेतील कुंती म्हणजेच नाझनीन यांना प्रेम आणि आपुलकीचे हे पडद्यावरील प्रतीक असूनही, त्यांचे वास्तविक जीवन आणि चित्रपट कारकीर्द संघर्ष, वाद आणि वेदनांनी भरलेली होती. नाझनीन यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता आणि त्यांना अभिनयाच्या जगात कधीच यायचे नव्हते. लहानपणापासूनच त्यांना एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न होते. पण नशिबाने वेगळाच डाव साधला होता. घरातील बिकट परस्थिती आणि दबावाखाली नाझनीन ग्लॅमरच्या दुनियेकडे वळल्या. त्यांनी 1972 साली ‘सारेगामाप’ या चित्रपटातून पदार्पण केले, पण बॉलिवूडचे ग्लॅमर दिसते तितके आकर्षक नव्हते. तर त्यानी 22 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केले.

नाझनीन काम मिळत पण साईड एक्टरचे मिळत असत, मात्र त्या परीस्थिती मुळे गरजे पोटी होकार देत असत मात्र महाभारत मधील कुंतीची भुमिका करुन त्यांना उत्तम ओळख मिळाली. तर आता एकेकाळी लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी ‘कुंती’ झगमगाटापासून दूर शांत जीवन जगत आहे की संघर्ष करत आहे. याची माहिती अजुन कोणालाही नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

महाभारत मधील घटोत्कच आठवतोय? ज्याच्या एंट्रीने थरथर कापायचे शत्रू, त्याच्या बलाढ्य आकाराने टीव्ही स्क्रीनही पडायची छोटी

हे देखील वाचा