Tuesday, April 16, 2024

ओटीटी प्लॅटफॉर्मवर जास्त सर्च केला जाणारा अभिनेता बनला किंग खान, ‘या’ मालिकेने पटकावले पाहिले स्थान

सध्या सर्वांच्याच तोंडात शाहरुख खान हे एकच नाव आहे. तुफान गाजत असणारा ‘पठाण’ पाहून ‘किंग इज बॅक’ असे म्हटले जात आहे. चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करणाऱ्या शाहरुखचा जलवा चांगलाच रंगला आहे. केवळ सहा दिवसात ३०० कोटींचे कलेक्शन करणाऱ्या पठाण सिनेमामुळे शाहरुख खान सगळीचकडेच नंबर वन स्थानावर विराजमान झाला आहे. बॉलिवूड आणि चित्रपटगृहांमध्ये टॉपला असणाऱ्या बादशहाची जादू इतर ठिकाणी देखील जोरदार पाहायला मिळत आहे. अमेझॉन फायर टीव्ही स्ट्रीमिंग ट्रेंड यांचा एक रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या रिपोर्टनुसार शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन सर्वात जास्त सर्च केले जाणारे कलाकार बनले आहेत तर आलू अर्जुनाचा ‘पुष्पा’ हा सिनेमा सर्च केला जाणारा सिनेमा बनला आहे.

प्राप्त रिपोर्टनुसार २०२२ या वर्षात शाहरुख खानला अमेझॉन फायर टीव्हीवर सर्वात जास्त सर्च केले गेले. या यादीत अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट यांचे देखील नाव सामील आहे. शाहरुख मागील चार वर्षांपासून चित्रपटांपासून लांब होता मात्र त्याने ‘पठाण’ सिनेमातून कमबॅक केले. `२०२१ आणि २०२२ या वर्षांमध्ये तो चित्रपटात पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसला. त्याने ‘ब्रह्मास्त्र’, ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या सिनेमांमध्ये ही भूमिका साकारली होती.

याच प्लँटफॉर्मवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये आलू अर्जुनाचा ‘पुष्पा’ तर रणबीर आणि आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ने दुसरे स्थान मिळवले आहे. त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा आहे. डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा सिनेमाने ३५० ते ३७५ कोटींचा व्यवसाय केला होता.

अमेझॉन फायर टीव्ही या प्लॅटफॉर्मवर यूजर्सने १२ पेक्षा अधिक प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांचा देखील आस्वाद घेतला. यात हिंदी, तामिळ, तेगू, मल्याळम, बंगाली आदी काही भाषांचा समावेश आहे. यासोबतच कौटुंबिक विभागात ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो नम्बर वन तर ‘अनुपमा’ शो दुसऱ्या नंबर आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांची भन्नाट केमिस्ट्री असणाऱ्या ‘शिव शास्त्री बलबोआ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
‘आई झाल्यानंतर सपनाचं करिअर संपलं’ म्हणणाऱ्यांची सपना चौधरीने घेतली शाळा; म्हणाली…

हे देखील वाचा