खुशखबर! शाहरुख खान करणार दक्षिणेच्या स्टार दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम, करणार डबल रोल


बॉलिवूडचा ‘बादशाह’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरूख खानने या वर्षात दोन सिनेमात दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहरूखने चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटाला सहमती दर्शवली असून या वर्षाच्या मध्यापर्यंत शूटिंगला सुरूवात होईल. हिरानीच्या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर शाहरूख खान दक्षिण भारतातील सुपरहिट दिग्दर्शक अटलीच्या चित्रपटाला सुरूवात करणार आहे.

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शाहरूखने यशराज फिल्मच्या बॅनरखाली ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली होती, ज्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद हे करीत आहेत. ‘झिरो’च्या नंतर ‘पठाण’चे शुटिंग सुरु होण्याआधी शाहरूखने बऱ्याच निर्मात्यांच्या स्क्रिप्ट ऐकल्या. त्यातले काही चित्रपट तो एकापाठोपाठ करणार आहे.

शाहरूख खानने ‘पठाण’ चित्रपटाद्वारे २०२१वर्षाची सुरूवात केली आहे आणि ते संपल्यानंतर राजकुमार हिरानी त्याच्याबरोबर आणखी एक चित्रपट करणार आहेत. राजकुमार हिरानीने आपल्या चित्रपटाची स्क्रिप्ट पुर्ण करण्यासाठी बराच वेळ घेतला होता. आता ते या वर्षी जुनपासून या चित्रपटाचे काम सुरू करु शकतात.

या चित्रपटाचे प्री-पोडक्शन सुरु झाल्याचे बोलले जात आहे. राजकुमार हिरानींची टीम शूटींग लोकेशन शोधण्यात व्यस्त असून उर्वरीत प्री-प्रोडक्शनची कामेही सुरू झाली आहेत.

हा चित्रपट नागिरकांचे स्थलांतर होताना येणाऱ्या अडचणींवर आधारित आहे. या सिनेमात शाहरूखची व्यक्तीरेखा त्याच्या ‘स्वदेश’ चित्रपटासारखी असेल, असे बोलले जात आहे. या चित्रपटात शाहरूख खानसोबत तापसी पन्नू काम करताना दिसणार आहे.

शाहरूख खानच्या आणखी एका चित्रपटाचे लवकरच काम सुरु होणार असून हा चित्रपट दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक असण्याची शक्यता आहे. हा चित्रपट सुपरहीट दिग्दर्शक अटलीची हे दिग्दर्शित करणार असून हा एक अँक्शनपट असणार आहे.  या चित्रपटात शाहरूख डबल रोल करणार आहे, असे म्हटले जात आहे. तसेच, या चित्रपटासाठी शाहरूख खानचे प्रोडक्शन हाऊस ‘रेड चीलीज’ काही हिंदी सिनेमातील दिग्गजांशी सतत चर्चा करत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.