काही सेकंदातच शाहिदने पूर्ण केला पत्नीने दिलेला ‘सेंटर ऑफ ग्राव्हिटी’ चॅलेंज, छोट्या भावानेही दिली प्रतिक्रिया

Shahid Kapoor Nails The Centre Of Gravity Challenge Like A Pro Wife Mira Rajput Is Impressed


सध्या सोशल मीडियावर ‘सेंटर ऑफ ग्राव्हिटी’ चॅलेंज भलतंच ट्रेंड होत आहेत. अगदी सामान्यांपासून ते बॉलिवूड पर्यंतचे अनेक कलाकार हे चॅलेंज स्वीकारत आहेत. आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. यात आता आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याची भर पडली आहे. हे जोडपे म्हणजे बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत.

शाहिद आणि मीराची जोडी ही सर्वोत्तम जोडीपैकी एक मानली जाते. ही जोडी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात हे त्यांनी पोस्ट केलेल्या प्रत्येक पोस्टमधून दिसून येतंच. नुकताच मीराने एक मजेशीर व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यात ती शाहिदला एक चॅलेंज देताना दिसतेय.

फार कमी लोक हे चॅलेंज करताना यशस्वी ठरतात, त्यामुळे मीराला देखील काहीसे असेच वाटले असावे की, शाहिद तिचे हे चॅलेंज पूर्ण करू शकणार नाही. पण मीराचा अंदाज शाहिदने खोटा ठरवला. शाहिदने तिचे हे चॅलेंज पूर्ण करून आपल्या प्रेमात पुन्हा एकदा पडायला भाग पाडले आहे. मीराचे हे चॅलेंज शाहिदने काही सेकंदातच पूर्ण केले आहे. आपण शाहिदला दिलेल्या या चॅलेंजवर मीरा भलतीच खुश आहे.

हा व्हिडिओ तिने पोस्ट केल्यावर शाहिदसाठी लिहिले आहे की, “चॅलेंज स्वीकारायला नेहमीच सज्ज, मिस्टर कपूर, तुम्हाला हे सहज जमलंय…” अशा गोड शब्दात तिने शाहिदची प्रशंसा केली आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच काही वेळातच लाखो व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. इतकंच नाही तर शाहिदच्या छोट्या भावाने देखील या व्हिडिओवर कमेंट करून आपण सुद्धा हे चॅलेंज पूर्ण केल्याचे सांगितले.

शाहिद आणि मीरा हे आपल्या फिटनेसबाबत नेहमी जागरूक असतात. बहुतेक वेळा त्यांना एकत्र जिमला जाताना पाहिले आहे. असे पहिल्यांदा नाही झाले आहे की, शाहिदने हा ट्रेंड फॉलो केला आहे. बऱ्याचदा अनेक वेळा त्याने असे अनेक ट्रेंड फॉलो केले आहेत. नुकताच तो पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याच्या या व्हिडिओलाही चाहत्यांची पसंती मिळाली होती.

शाहिद कपूरने आपल्या ‘जर्सी’ या चित्रपट रिलीझची तारीख आपल्या सोशल मीडियाद्वारे जानेवारीमध्ये सांगितली होती. एकाच दिवशी शाहिद कपूर आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे दोघांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांच्या चित्रपटाला जोरदार टक्कर देणार आहेत. जर्सी हा चित्रपट एका तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात तो एका क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. ज्यात तो हुशार आहे पण अयशस्वी क्रिकेटर आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंत बनली ‘नागिन’, पाहा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेत्रीचा अवतार

-आमिर आणि एलीचं ‘हे’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, डान्स मुव्ह पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, पाहा व्हिडिओ

-‘ग्रीक गॉड’ ऋतिक रोशनचे आलिशान घर पाहून तुम्हीही व्हाल थक्क, एकदा पाहाच


Leave A Reply

Your email address will not be published.