Wednesday, April 23, 2025
Home बॉलीवूड ओहो… नाचा रे! जेव्हा शाहरुख खान आणि थालापती विजय एकत्र करतात डान्स, व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

ओहो… नाचा रे! जेव्हा शाहरुख खान आणि थालापती विजय एकत्र करतात डान्स, व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

तमिळ सुपरस्टार थालापती विजयने आपल्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. यासह, मागील वर्षी विजयने आपला चित्रपट ‘मास्टर’ यातील ‘वाथी कमिंग’ या गाण्याने लोकांना वेड लावले होते. या गाण्यामधील, त्याच्या डान्स मूव्ह बघून कोणीही चाहता होऊ शकतो. गेल्या वर्षी मार्चमध्ये मास्टर चित्रपटाचा ऑडिओ रिलीज फंक्शनही घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर भारतात कोरोनाच्या वाढत्या विषाणूंमुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली होती.

यानंतर हा कार्यक्रम मोठ्या मैदानावर, किंवा महाविद्यालयीन सभागृहात न ठेवता, हॉटेलमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी केवळ निवडक लोकांना, आमंत्रित केले गेले होते. या कार्यक्रमात विजय चाहत्यांमध्ये दिसला होता, आणि चाहते त्याला सतत डान्स करण्याचे आवाहन करत होते. विजयही ब्लॅक सूटमध्ये खूप सुंदर दिसत होता. आपल्या भाषणानंतर, विजय कुणालाही न सांगता स्वत: डान्स मूव्ह करताना दिसला होता.

हा कार्यक्रम आणि गर्दीमुळे एका आठ वर्ष जुन्या कार्यक्रमाची आठवणही प्रेक्षकांच्या मनात ताजी झाली होती. हा एक पुरस्कार सोहळा होता, ज्यात सुपरस्टार शाहरुख खान देखील स्टेजवर हजर होता. विजयने पुरस्कार जिंकल्यानंतर, शाहरुखने आपल्या शैलीत विजयला ‘गूगल-गूगल’ गाण्यावर डान्स करण्याचे आवाहन केले होते. आता शाहरुखची विनंती कोण टाळू शकेल? विजय जेव्हा डान्स करायला लागतो, तेव्हा शाहरुख खान देखील त्याला बघून तसाच डान्स करायला लागतो.

हा व्हिडिओ सन २०१३ चा आहे. शाहरुख खान एका पुरस्कार सोहळ्यात, चेन्नईत येथे दाखल झाला होता. इथे इतकी उष्णता होती की, शाहरुखचा संपूर्ण शर्ट घामाने भिजला होता, कारण हॉटेलमधील वातानुकूलित वातावरणही या वेळी चांगले काम करत नव्हते. असे असले तरीही शाहरुख खान स्टेजवर असण्याने, यामुळे काहीच फरक पडत नाही. कारण चाहते आणि कलाकार त्याच्या या उर्जेसमोर सर्व काही विसरले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! हॉलिवूडमध्ये जाण्यास राखी सावंत सज्ज, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

-‘तुम्ही असे उड्या मारत राहिलात तर…’, फिटनेस फ्रिक मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटच्या व्हिडिओवर युजरची मजेदार प्रतिक्रिया

हे देखील वाचा