×

किंग खानने केली नव्या चित्रपटाची घोषणा, तब्बल पाच वर्षांनी ‘या’ अभिनेत्रीसोबत झळकणार रुपेरी पडद्यावर

अनेक महिन्यांपासून बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली होती. आता शाहरुखच्या चाहत्यांची ही उत्सुकता संपली असून, नुकताच अभिनेता शाहरुखने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या ‘डुंकी’ चित्रपटात शाहरुख खान झळकणार आहे. शाहरुख खानच्याच रेड चिली इंटरटेनमेंटने केली आहे. युट्यूबवर चित्रपटाबद्दल माहिती देणारा व्हिडिओ रेड चिली इंटरटेनमेंट करुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शाहरुखची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखच्या चाहत्यांना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे. 

शाहरुख खान शेवटचा २०१८ मध्ये ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता, ज्यात अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि कॅटरिना कैफ सह कलाकार होते. त्यानंतर आता पाच वर्षांनी अभिनेता शाहरुख खान प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार हिराणी यांच्या ‘डुंकी’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह अभिनेत्री तापसी पन्नूदेखील (Taapsee Pannu) अभिनय करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेचा व्हिडिओ युट्यूबवर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये सुरूवातीला राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केलेले आणि लोकप्रिय झालेल्या चित्रपटांचे पोस्टर दिसत आहेत. ज्यामध्ये ‘थ्री इडियट्स’, ‘पीके’, ‘संजू’ या चित्रपटांचा समावेश आहे. तर अभिनेता शाहरुख खान त्याच्या खास स्टाईलमध्ये उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी दिग्दर्शक आणि शाहरुख खान यांचा संवाद पाहायला मिळतो, ज्यामध्ये शाहरुख खान त्याच्यासाठी एखादी भूमिका आहे का? असे विचारताना दिसत आहे. त्यानंतर दिग्दर्शक या चित्रपटाची घोषणा करताना दिसत आहेत. तसेच अभिनेता शाहरुख खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुनही या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा किंग खानचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Latest Post