Sunday, August 2, 2026
Home बॉलीवूड किंग खानपासून ते कॅटरिनापर्यंत जाणुन घ्या ‘हे’ कलाकार खऱ्या आयुष्यात कोणाला घाबरतात

किंग खानपासून ते कॅटरिनापर्यंत जाणुन घ्या ‘हे’ कलाकार खऱ्या आयुष्यात कोणाला घाबरतात

चित्रपटांच्या रुपेरी पडद्यावर सर्वगुण संपन्न असणारे कलाकार मंडळी खऱ्याखुऱ्या आयुष्यात कसे जीवन जगतात, याची अभिरुची त्यांच्या चाहत्यांना कायम असते. लाखो खलनायकांना गपगार करणारे अभिनेते असो, वा आपल्या बिनधास्त अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या नटी असो. हे सर्व आपल्या पडद्यामागील खऱ्या आयुष्यात कोणत्या गोष्टींना घाबरतात, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या मंडळींना कोणकोणत्या गोष्टींचा फोबिया जाणून घेऊया.

शाहरुख खान – इक्विनोफोबिया
बॉलिवूडचा किंग खान म्हणून ज्याची देशातच नाही तर जगात ओळख आहे, असा शाहरुख खान कशाला घाबरतो हे आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. शाहरुख आपल्या चित्रपटांमध्ये कायम ऍक्शन सीन करताना दिसतो. लाखो मुलींच्या काळजाचा ठोका चुकवणारा बाजीगर आपल्या खऱ्या आयुष्यात घोड्यांना प्रचंड घाबरतो. करण-अर्जुन चित्रपटात शाहरुखचा घोड्यावर बसून एक सीन होता. या सीन दरम्यान शाहरुखला एवढी धास्ती भरली, की त्याने स्वतःला दुखापत करून घेतली होती.

 

दीपिका पदुकोण – ओफिडियोफोबिया
बॉलीवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला ओफिडियोफोबिया आहे. ओफिडियोफोबिया ग्रस्त रुग्णांना सापासारख्या प्राण्यांची खूप भीती वाटते. दीपिकाला ओफिडियोफोबिया असल्याने ती सापापासून दूर राहणेच ती पसंद करते.

 

सलमान खान- क्लिथ्रोफोबिया
दबंग खान आपल्या चित्रपटांमध्ये शेवटी खलनायकाचा खात्मा करत असतो. पण खऱ्या आयुष्यात सलमान खानला क्लिथ्रोफोबिया आहे. त्यामुळे सलमानला कुठे अडकण्याची भीती कायम असते. म्हणूनच सलमानची लिफ्टमधून प्रवास करताना अनेकदा दमछाक होते. (shahrukh khan to katrina kaif are scared of these things)

 

आलिया भट्ट- निक्टोफोबिया
अभिनेत्री आलिया भट्ट ही निक्टोफोबियाने ग्रस्त आहे. यामध्ये रुग्ण काळोखाला प्रचंड घाबरतात. काही माहितीनुसार आलियाला कोळख होताच लगेच भीती वाटते. त्यामुळे तिला थोड्यातरी प्रकाशाची आवश्यकता असते.

रणबीर कपूर- काट्सरिडाफोबिया
बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर याला काट्सरिडाफोबिया आहे. यामध्ये रुग्णांना किडे मकोड्यांची भीती वाटते. किड्यांच्या भीतीपोटी रणबीर किड्यांपासून दूर राहणेच पसंद करतो.

https://www.instagram.com/p/CRtibhfsa12/?utm_source=ig_web_copy_link

कॅटरिना कैफ- हर्पेटोफोबिया, लाइकोपर्सिकोफोबिया

कॅटरिना कैफ हिला हर्पेटोफोबिया म्हणजेच पालीची भीती वाटते. तर लाइकोपर्सिकोफोबियामध्ये टोमॅटोची भीती वाटते. याचा खुलासा कॅटरिनाने ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’ या चित्रपटामधील टोमॅटो फेस्टिव्हल शूटिंगच्या दरम्यान केला होता.

विक्की कौशल- एक्वाफोबिया
बॉलीवूडमध्ये कमी काळात वर येणारा अभिनेता विक्की कौशल याला एक्वाफोबिया आहे. विक्कीला पाण्यात डुबण्याची अधिक भीती वाटते.

 

प्रियांका चोप्रा- इक्विनोफोबिया
आंतरराष्ट्रीय अभिनेत्री म्हणून जगप्रसिद्ध असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला इक्विनोफोबिया आहे. शाहरुख खानप्रमाणे प्रियांकाला पण घोड्यांची भीती वाटते.

अभिषेक बच्चन- फ्रुक्टोफोबिया
अभिषेक बच्चन याला फ्रुक्टोफोबिया आहे. याविषयी खूप कमी जणांना माहीत आहे. या फोबिया प्रकारात रुग्णांना फळांची भीती वाटते. अभिषेक यांच्या या फोबियामुळे क्वचित त्याने फळं खाल्ली असतील.

सोनम कपूर- क्लिथ्रोफोबिया, क्लॉस्ट्रोफोबिया
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला दोन फोबिया आहेत, क्लिथ्रोफोबिया आणि क्लॉस्ट्रोफोबिया. पहिल्या फोबिया प्रकारात रुग्णाला कुठे अडकण्याची भीती वाटते तर दुसऱ्या फोबिया प्रकारात रुग्ण बंद जागेत अडकतो तेव्हा हा फोबिया निर्माण होतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्युटी इन ब्लॅक!’ सोनाक्षी सिन्हाच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती

-प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये नेहा कक्करचा मोठा निर्णय; या कारणामुळे ‘इंडियन आयडल’च्या फिनालेमध्येही नाही दिसणार गायिका

-राजकुमार राव- राधिका आपटे नेटफ्लिक्सवर झळकणार एकत्र; ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा पहिला लूक आला समोर

हे देखील वाचा