Thursday, March 28, 2024

‘शाका लाका बूम बूम’ फेम ‘संजू’ आहे तरी कुठं? प्रेक्षकांना लावले होते जादूच्या पेन्सिलचे वेड

नव्वदच्या दशकात लहान मुलांनाही लक्षात घेऊन मालिका बनवले जात होत्या. त्याकाळी येणाऱ्या मालिका अशा होत्या की, लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडत असायच्या. यामध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेचे नावही सामील आहे. या मालिकेला चाहत्यांकडून जबरदस्त प्रेम मिळाले होते. ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेमधील संजू नावाच्या एका मुलाला जादूची पेन्सिल मिळते आणि त्यातून तो जे काही बनवायचा, ती गोष्ट त्याच्या समोर खरोखर येत असायची.

सध्या कुठे असतो किंशुक वैद्य?
ही मालिका जेव्हा आली, तेव्हा सर्व लहान मुलांची इच्छा असायची की, ‘शाका लाका बूम बूम’ पेन्सिल आमच्याकडेही असावी. या मालिकेत मुख्य भूमिकेतील संजूला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले होते. संजूचे खरे नाव हे किंशुक वैद्य आहे. त्याने त्याच्या निरागसपणाने व अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकले होते. तसेच सध्या किंशुक कुठे असतो आणि तो काय करत आहे? याबाबत अनेकांना जाणून घ्यायचे आहे. चला तर जाणून घेऊया…

संजूच्या भूमिकेनंतर किंशुकचे भरपूर कौतुक करण्यात आले होते. त्याचा अभिनय देखील चाहत्यांना खूप आवडला होता, त्यामुळे सगळी लहान मुले त्याच्यासारखी बनण्याचा प्रयत्न करत होती. या मालिकेतून त्याला खूप यश मिळाले होते. तो सध्या २८ वर्षाचा झाला असून तो फिल्मी दुनियेत खूप सक्रिय आहे.

त्याचा पहिला चित्रपट अजय देवगण आणि काजोल यांच्यासोबत ‘राजू चाचा’ होता. या चित्रपटात तो राहुलच्या भूमिकेत दिसला होता, त्यावेळी तो फक्त नऊ वर्षाचा होता. यावेळी त्याला बी. आर. चोप्रा यांच्या विष्णू पुराणमध्ये प्रल्हाद बनण्याची संधी मिळाली होती आणि या मालिकेला देखील खूप लोकप्रियता मिळाली होती.

‘शाका लाका बूम बूम’ हा मालिका २००४ मध्ये संपल्यावर त्याने अभिनयातून मोठा ब्रेक घेतला होता. त्यानंतर शिक्षणाकडे लक्ष देत त्याने बॅचलर ऑफ मीडियाची पदवी घेतली. त्यातील जाहिरातीमध्ये स्पेशल केले आहे. ‘एक रिश्ता साझेदारी का’ या मालिकेतून तो परत अभिनयाकडे वळला. त्याने सन २०२० मध्ये ‘राधाकृष्ण’ मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारली होती. तसेच तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि चाहत्यांसाठी आपले फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

हे देखील वाचा