शन्मुखप्रियाचे गाणे ऐकून पुन्हा भडकले प्रेक्षक; वाढला शोमधून बाहेर काढण्याच्या मागणीचा जोर

shanmukhapriya trolled singing asha bhosle song


टेलिव्हिजन क्षेत्रातला सर्वात मोठा आणि प्रसिद्ध लोकप्रिय रियॅलिटी शो म्हणून नेहमीच ‘इंडियन आयडल’चे नाव घेतले जाते. या शोने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक मोठे आणि चांगले गायक दिले आहेत. गायनाच्या क्षेत्रात नवीन उभारी घेणाऱ्या गायकांसाठी हा मंच म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची आणि गायक होण्याची एक पर्वणीच आहे. त्यामुळेच प्रेक्षकांच्या मनात या शोसाठी जागा खास आहे.

सध्या ‘इंडियन आयडल’चे १२ वे पर्व सुरु आहे. मात्र हे पर्व स्पर्धकांच्या दमदार गाण्यांमुळे आणि एक से बढकर एक सादरीकरणांमुळे न गाजता अनेक वादांमुळे गाजत आहे. या शो मध्ये स्पर्धकांची खोटी स्तुती करण्यासाठी दबाब आणला जात असल्याचा खळबळ जनक आरोप अमित कुमार यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. हा वाद शांत होत नाही, तोवर नुकत्याच झालेल्या भागात अंजली गायकवाडला शो मधून बाहेर काढल्यामुळे एकीकडे संताप व्यक्त होत असताना, आता दुसरीकडे या शोची स्पर्धक असलेल्या शन्मुखप्रियाला शो तू बाहेर काढण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.

झीनत अमान यांनी हजेरी लावलेल्या भागात, शन्मुखप्रियाने झीनत अमान यांचे ‘चुरा लिया है’ हे एव्हरग्रीन गाणे गायले. या गाण्याचे शन्मुखप्रियाने केलेले सादरीकरण पाहून प्रेक्षकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. याआधी देखील शन्मुखप्रियाला तिच्या गाण्याच्या स्टाइलमुळे आणि सादरीकरणामुळे ट्रोल केले गेले आहे.

आशा भोंसले यांनी गायलेले हे गाणे १९७३ साली आलेल्या ‘यादों की बारात’ सिनेमातील असून, आशा भोसले यांच्या या ओरिजनल गाण्यात शन्मुखप्रियाने केलेले बदल प्रेक्षकांना न पटल्याने त्यांनी तिला ट्रोल केले आहे. सोबतच दानिशला देखील ट्रोल केले जात आहे.

शन्मुखप्रियाच्या सादरीकरणावर अनेक मजेशीर मिम्स सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यामुळे आता शन्मुखप्रिया आणि दानिश यांच्याबद्दल शो कडून कोणते स्पष्टीकरण येते हे पाहणे औसूक्त्याचे राहील.


Leave A Reply

Your email address will not be published.