बॉलिवूडमधील ‘काटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाचे विमानतळावर पतीला खास सरप्राईझ; नेटकरी म्हणाले, ‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’


सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे सामान्य माणसांपासून ते अनेक कलाकारांपर्यंत अनेकजण त्यांच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतो. बॉलिवूड कलाकार तर यात सर्वात टॉपला आहेत. बॉलिवूडमधील ‘काटा लगा गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला. शेफाली सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना तिच्याशी जोडून ठेवते. अशातच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेफाली नुकतेच काही दिवसांपूर्वी विमान तळावर स्पॉट झाली होती. तिने तिच्या पतीला मुंबई विमानतळावर सरप्राईझ दिले होते. तिचा पती पराग त्याच्या एका मालिकेचे शूटिंग पूर्ण करून मुंबईला आला. त्यावेळी शेफाली त्याला न सांगता विमान तळावर घ्यायला पोहोचली. पराग जसा बाहेर आला तेव्हा शेफाली खूपच उत्सुक झाली आणि त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. हे सगळं पाहून सगळेजण तिला ट्रोल करत आहेत. युजर तिला ‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’ म्हणत आहेत.

शेफालीने या वेळी हिरव्या रंगाचा जंपसूट घातला आहे. जिने ज्याप्रकारे तिच्या पतीला मिठी मारली. त्यावरून तिला सगळे ‘ड्रामा क्वीन’ म्हणत आहेत. परागच्या‌‌ आधी हरमित सिंगसोबत तिचे लग्न झाले होते. एका मुलाखतीत तिने हरमीतसोबत असलेले तिचे नाते आणि त्यांच्या घटस्फोटाबाबत सांगितले होते. यासोबतच त्यांचे वेगळे होण्याचे कारण देखील सांगितले. ते जवळपास 5 वर्ष एकत्र होते.

शेफालीचे असे म्हणणे आहे की, जर ती आता आर्थिकदृष्टया मजबूत झाली आहे, तर तिला स्वतंत्र आयुष्य अनुभवण्याची संधी मिळाली आहे. 2009 मध्ये तिचा हरमीत सोबत घटस्फोट झाला. त्यांनतर 2014 मध्ये तिने परागसोबत दुसरे लग्न केले होते.

शेफाली जरीवालाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 2002 रोजी ‘काटा लगा’‌ या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते. या एकाच गाण्याने तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिला सगळेजण ‘काटा लगा गर्ल’ या नावाने ओळखू लागले. तिने अनेक रियॅलिटी शो आणि अनेक कन्नड चित्रपटात देखील काम केले आहे. यानंतर ती ‘नच बलिये’ या शोमध्ये दिसली होती. तिने ‘बेबी कम ना’ या वेब सीरिजमध्ये श्रेयस तळपदेसोबत काम केले आहे. तसेच ती ‘बिग बॉस 13’ ची स्पर्धक देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय


Leave A Reply

Your email address will not be published.