Saturday, November 23, 2024
Home कॅलेंडर ‘लोकांसाठी आम्ही फक्त एक हॅशटॅग होतो पण माझ्यासाठी…’ शहनाजने सिद्धार्थबद्दल केले ‘हे’ वक्तव्य

‘लोकांसाठी आम्ही फक्त एक हॅशटॅग होतो पण माझ्यासाठी…’ शहनाजने सिद्धार्थबद्दल केले ‘हे’ वक्तव्य

टिव्हि अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि सिद्धार्थ शुक्ला(Sidharth Shukla)  यांच्या निखळ मैत्रीची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असते. ‘बिग बॉस १३’ च्या पर्वात या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली. या कार्यक्रमात दोघांच्यात वाढलेली जवळीकता आणि तिथून सुरू झालेली त्यांच्या मैत्रीचा प्रवास प्रत्येकाने अनुभवला होता. या कार्यक्रमात सिद्धार्थ आणि शेहनाज नेहमीच एकत्रपणे वावरताना दिसले. कधी भांडणातुन तर कधी काळजीतून दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावली. मात्र त्यांच्या या प्रेमळ नात्याला सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने ग्रहण लागले. आपल्या लाडक्या मित्राच्या जाण्याने प्रचंड दुखावलेली शहनाजने तेव्हापासून एकांतात राहणे पसंत केले होते. आता हळूहळू ती पून्हा एकदा आपल्या कामात लक्ष देताना दिसत आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत बोलताना सिद्धार्थ आणि तिच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अलिकडेच अभिनेत्री शहनाज गिलने एका प्रसिद्ध मासिकासाठी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दल सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली की,  “लोकांसाठी सिद्धार्थ आणि माझा Sidnaaz हा एक हॅशटॅग असेल. माझ्यासाठी हा आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास आहे. लोकांसाठी आमची जोडी फक्त त्यांची लाडकी जोडी म्हणूनच आवडीची होती. पण माझ्यासाठी हा एक गोड अनुभव होता जो सदैव माझ्यासोबत राहील. लोकांनी आम्हाला इतके प्रेम दिले त्याबद्दल त्यांचे आभार.”

याआधीही शहनाज शिल्पा शेट्टीच्या “शेफ ऑफ यु” कार्यक्रमात आली होती. ज्यामध्ये ती दिलखुलास हसताना दिसली होती. ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले होते. मात्र सिद्धार्थला मला नेहमीच हसताना पाहायचे होते, त्याला कधीच मी दुःखी असावे असे वाटले नाही म्हणत या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते. दरम्यान शहनाज गिलला पंजाबची कॅटरिना कैफ असेही म्हणले जाते. तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे शहनाज नेहमीच चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा