व्हिडिओ: शूटिंगनंतर आलिशान कारमधून जाताना दिसली शहनाझ गिल; गाडीची किंमत वाचून सरकेल पायाखालची जमीन


मागील काही काळापासून अभिनेत्री, मॉडेल असणारी शहनाझ गिल चर्चेत आली आहे. बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यापासून शहनाझ गिल मोठ्या स्वरूपात लाईमलाईटमध्ये आली आहे. सध्या ती हळहळू यश मिळवत पुढे जात आहे. सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारी शहनाज आता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

शहनाझला नुकतेच मुंबईमध्ये स्पॉट करण्यात आले. यावेळी शहनाझ चर्चेत आल्याचे कारण खूपच वेगळे आहे. शहनाझला मुंबईत पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज बेंझ गाडीमध्ये पॅपराजींनी स्पॉट केले आहे. पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि जीन्स घातलेली शहनाझ या गाडीमध्ये बसून फोनवर बोलताना दिसली. पॅपराजींना पाहून शहनाझने सर्वांना हाय देखील म्हटले, आणि ती निघून गेली.

कार देखो डॉट कॉमच्या माहितीप्रमाणे शहनाझने घेतलेल्या गाडीची किंमत २.१७ कोटी आहे. या गाडीमध्ये दोन मॉडेल्स आहे, एक मर्सिडीज बेंज एस क्लास गाडी २.१७ कोटींची असून, दुसरी गाडी २.१९ कोटींची आहे.

काही दिवसांपूर्वीच शहनाझने तिचे स्वतःचे एक यूट्यूब चॅनेल सुरू केले असून, यात ती तिचे विविध व्हिडिओ अपलोड करताना दिसते. यात तिने तिच्या मेकअपचा पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. या यूट्यूब चॅनेलवर शहनाझने नुकतेच एक लाईव्ह सेशन घेतले होते. त्यादरम्यान तिने तिच्या ट्रान्सफॉर्मेशन लूकबद्दल सविस्तर माहिती फॅन्सला देत या ट्रान्सफॉर्मेशनच्या मागचे कारण देखील सांगितले.

माध्यमांतील वृत्तानुसार, लॉकडाऊनमध्ये शहनाझने तिचे जवळपास १२ किलो वजन कमी केले आहे. केवळ सहा महिन्यांमध्ये तिने तिचे हे वजन कमी केले आहे. यासाठी तिने एक डाएट देखील पाळले. तिचे डाएट सांगताना ती म्हणाली, ती रोज सकाळी उठून मुग खायची, सोबतच चहा देखील प्यायची. दुपारी जेवणात कमी तेलात बनवलेली डाळ, भाजी आणि भात खायची. संध्याकाळी चहा आणि रात्री दूध पिऊन झोपायची. याशिवाय ती दिवसभर जास्तीत जास्त पाणी प्यायची.

शहनाझ लवकरच ‘हौसला रख’ चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत दिलजीत दोसांझही दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग कॅनडामध्ये झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.