लाल रंगाच्या वनपीसमध्ये अतरंगी अंदाजमध्ये डान्स करताना दिसली शिल्पा शेट्टी

बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या स्टाईल आणि लूकसाठी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. वर्षानुवर्षे असलेली तिची क्रेझ आजही अजिबात कमी झालेली नाही. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच सोशल मीडियावर ती तिच्या फिटनेस आणि स्टाईलमुळे खूप चर्चेत राहते. यासोबतच तिचे डान्सचे व्हिडीओ, फनी व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर नेहमीच धमाका करताना दिसतात. दरम्यान, तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये ती अतरंगी अंदाजमध्ये डान्स करताना दिसत आहे. ह्या डान्स व्हिडिओमुळे शिल्पा शिट्टी सध्या ट्रेडमध्ये आहे. ‘In Da Getto’ या इंग्लिश गाण्यावर ती खूप मजेदार डान्स करताना दिसत आहे.

तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ह्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Vibing In Da Getto’ असे लिहिले आहे. शिल्पाचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते खूप हसत आहे. तिच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने कंमेंट केले की, ‘वाह क्या बात है, शानदार डान्स’. तर दुसऱ्याने लिहिले ‘सुपर से भी उपर मॅम’. या व्हिडिओमध्ये ती लाल रंगाच्या वनपीसमध्ये कमाल दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

याआधी देखील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये ती जीममध्ये वर्कआऊट करत होती. या व्हिडिओच्या सुरुवातीला ती पाठमोरी उभी राहून केसांना वर बांधताना दिसली. या व्हिडिओमध्ये दिसले की, तिने डोक्याच्या मागच्याबाजूला खाली असलेले केस काढून टाकले आहे. तिचे केसांमध्ये असलेले टक्कल या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसले.

शिल्पा शेट्टीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच ती ‘हंगामा २’ मध्ये दिसली होती. या सिनेमाच्या निमित्ताने ती अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतली. लवकरच ती ‘निकम्मा’ चित्रपटात दिसणार असून, यात ती भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेतियासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

Latest Post