‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील एक बहुचर्चित आणि लोकप्रिय शो आहे. मराठीमध्ये देखील या शोचे दोन सिझन पूर्ण आहे आहेत आणि नुकतेच ‘बिग बॉस मराठी”चे तिसरे पर्व सुरू झाले आहे. या पर्वामध्ये अनेक अतरंगी सदस्य पाहायला मिळत आहेत. अनेकांचे खरे चेहरे समोर येत आहेत. नुकतेच घरात वीकेंडचा डाव रंगला होता. या वेळी मांजरेकरांनी सगळ्यांची शाळा घेतली. या दरम्यान शिवलीला हिला देखील चांगलेच सुनावले होते. मागच्या आठवड्यात ती घरात जास्त सहभागी नव्हती तसेच कोणत्याही टास्कमध्ये ती दिसली नव्हती. यावेळी मांजरेकरांनी तिला खेळात जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी सांगितले.
यावेळी अनेक स्पर्धकांनी देखील ती मागच्या आठवड्यातील सर्वात वाईट मालकीण होती, असे सांगितले. त्यामुळे एकंदरीत तिचा घरातील परफॉर्मन्स कमी पडतोय हे तिला सांगण्यात आले. या सगळ्यानंतर आता शिवलीला तिचा गेमप्लॅन आखताना दिसत आहे. वीकेंडच्या रात्री शिवलीला मीनल आणि विकाससोबत बसून गेमप्लॅन आखताना दिसली आहे. (Shivleela patil creating her gameplan with vikas and minal in bigg Boss Marathi house)
यावेळी शिवलीला मीनल आणि विकास यांना बोलते की, “त्या ग्रूपने खूप मोठी स्ट्रॅटेजी केली आहे. आपल्याला आता त्यांच्या ग्रूपमधील माणसं फोडायला लागतील. धडाधड माणसं पाडायची आणि पाडताना हे लक्षात ठेवा की, जी पडणार नाही त्यांना पाडण्याचा प्रयत्न करायचा नाही, तर जे सहज पडू शकतील त्यांना पाडायचे.” यावर मीनल आणि विकास दोघेही तिचे बोलणे काळजीपूर्वक ऐकत असतात. यानंतर ती म्हणते की, “इकडे अशी माणसं आहेत, जी दोन्ही नावेत पाय ठेवून चालतात आणि जेव्हा ते पडतील ना तेव्हा त्या ग्रूपमधील त्यांना वाचवायला कोणीच येणार नाही. त्यांना पण कळू देत ना मग या घरात कशी माणसं आहेत ते.”
अत्यंत शांत वाटणारी शिवलीला आता या घरात काय कमाल करून दाखवणार आहे, याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. यासोबत या आठवड्यात शिवलीला पुन्हा एकदा नॉमिनेट झाली आहे. त्यामुळे आता तिचे चाहते तिला घराबाहेर जाण्यापासून वाचवतील का?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तरुणांना मागे टाकत ‘बिग बॉस’ जिंकली होती ‘ही’ मिश्यांमधील वृद्ध महिला, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित
-बोल्ड फोटोंमुळे राधिका आली होती ट्रोलर्सच्या निशाण्यावर; ‘माझं शरीर…’, म्हणत सुनावले त्यांना खडेबोल
-‘त्या’ व्यक्तीमुळे लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, ‘अशी’ आहे त्यांची अपुरी प्रेमकहाणी