‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व चालू होऊन आता दोन आठवडे झाले आहेत. या दोन आठवड्यात घरातील सदस्यांचे अनेक रंग पाहायला मिळाले आहेत. या काळात घरात भांडणतंटे, शिवीगाळ पाहायला मिळाली आहे. तसेच या आठवड्यात आजारी असल्यामुळे घरातील शिवलीला पाटील देखील वैद्यकीय उपचारांसाठी घराबाहेर गेली आहे. शिवलीला ही या आठवड्यात नॉमिनेट होती. परंतु ती आजारी असल्यामुळे कोणताही टास्क खेळू न शकल्याने बिग बॉसने या आठवड्याचे इलिमिनेशन रद्द केले होते.
या आठवड्यात वीकेंडचा डाव देखील चांगलाच रंगला होता. आठवड्याभराची शाळा मांजरेकरांनी एकदाच घेतली. या आठवड्यात ज्यांनी उत्तम कामगिरी केली त्यांचे महेश मांजरेकर यांनी कौतुक केले. मात्र, ज्यांनी चुकीची वागणूक केली त्यांना चांगलाच ओरडा बसला आहे. मांजरेकरांनी या आठवड्याची सर्वोत्कृष्ट स्पर्धक म्हणून मीनल हिचे नाव घेतले. याच वेळी या आठवड्यात आणखी एक मोठी घोषणा झाली. ती घोषणा शिवलीला हिने केली.
(Shivleela patil exit from bigg Boss Marathi 3 house, for health issues)
शिवलीला घराच्याबाहेर वैद्यकीय उपचार घेत आहे. परंतु तिची प्रकृती काही ठीक नाहिये. यावेळी शिवलीलाचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. ज्यात ती म्हणत आहे की, तिची प्रकृती ठीक नाहीये. अनेक औषधोपचार करून देखील तिला काही फरक पडत नाहीये. तिच्या अंगात शक्ती नाहीये. त्यामुळे ती या शोमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेत आहे. यासोबत तिने घरातील सगळ्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या. शिवलीलाने तिच्या भावना व्यक्त केल्यावर घरातील काही सदस्यांना मात्र त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. शिवलीलाचा हा व्हिडिओ बघताना विशाल, मीनल, सोनाली तसेच सुरेखा ताई यांना अश्रू अनावर झाले.
शिवलीलाने टास्कमध्ये जास्त काही कामगिरी केली नसली, तरीही प्रेक्षकांना तिला पाहायला खूप आवडते होते. एका वेगळ्याच क्षेत्रातून आलेली ही मुलगी या घरात अगदी आनंदाने आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होती. तिच्या शांत स्वभावाने तिने अनेकांची मने जिंकून घेतली होती. परंतु आता तिच्या घराबाहेर जाण्याने प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-