Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड Stree | श्रद्धा कपूर पुन्हा बनणार ‘स्त्री’? घाबरायला सज्ज व्हा मंडळी!

Stree | श्रद्धा कपूर पुन्हा बनणार ‘स्त्री’? घाबरायला सज्ज व्हा मंडळी!

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि अभिनेता राजकुमार राव (Rajkumarr Rao) यांच्या ‘स्त्री’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील श्रद्धाचा अभिनयही खूप पसंत केला गेला होता. ‘स्त्री’च्या यशानंतर आता निर्माते या प्रकारच्या हॉरर कॉमेडी चित्रपटावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. त्याचवेळी, श्रद्धा कपूर ‘स्त्री’ चित्रपटाच्या प्रीक्वलचे शूटिंग सुरू करणार असल्याची बातमी येत आहे. 

लवकरच सुरू होईल ‘स्त्री’च्या प्रीक्वलचे शूटिंग
‘स्त्री’च्या बंपर यशानंतर निर्माता दिनेश विजन यांनी राजकुमार राव आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांना घेऊन ‘रुही’ हा चित्रपट बनवला. मात्र हा चित्रपट काही खास दाखवू शकला नाही. यानंतर नुकतीच वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेननच्या (Kriti Sanon) ‘भेडिया’ चित्रपटाची घोषणा झाली. त्याचवेळी, ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या प्रीक्वलवर लवकरच काम सुरू होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूरने या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी होकार दिला आहे. या वर्षी ऑगस्टपर्यंत हा चित्रपट फ्लोरवर येईल. (shraddha kapoor to start shooting for stree prequel in august)

‘स्त्री’ बनून पुन्हा घाबरणार श्रद्धा कपूर
‘स्त्री’च्या प्रीक्वलची बातमी ऐकून चाहते नक्कीच उत्साहित झाले असतील. आता प्रश्न पडतो की, जी ‘स्त्री’मध्ये होती तीच स्टारकास्ट या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे का? म्हणजेच राजकुमार राव, अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurrana) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) दिसतील, का त्यांना रिप्लेस केले जाईल? ही प्रश्न सध्या गुलदस्त्यातच आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर श्रद्धा कपूर सध्या दिग्दर्शक लव रंजनच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय श्रद्धा विशाल फुरियाच्या ‘नागिन’ चित्रपटात दिसणार आहे. ‘चालबाज इन लंडन’ हा देखील श्रद्धाच्या आगामी चित्रपटांपैकी एक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा