[rank_math_breadcrumb]

2013 पूर्वी गायकांची अशी होती परिस्थिती..,श्रेया घोषाल यांनी म्युझिक इंडस्ट्रीबद्दल केला मोठा खुलासा

श्रेया घोषाल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. आपल्या सुरेल आवाजाने तिने मनवा लागे, तेरी मेरी, बरसो रे, साथिया, मेरे ढोलना, हसी, चिकनी चमेली यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत तिनं म्युझिक इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा करत 2013 पूर्वी गायिकांची परिस्थिती कशी होती, याबद्दल सांगितलं.

अलीकडेच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना श्रेया घोषालने (Ghoshal)म्युझिक इंडस्ट्रीतील अनेक गोष्टींवर भाष्य केल. 2013 हे वर्ष करिअरमधील डाउनफॉलचे वर्ष का होत, असा प्रश्न विचारल्यावर तिनं सांगितल की, त्या काळात सिंगर्सनी रॉयल्टीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली होती. आम्ही रॉयल्टीसाठी आवाज उठवला आणि त्यामुळ संपूर्ण इंडस्ट्री दोन भागांत विभागली गेली.”

ती पुढ असेही म्हणाले की “आपल्या इंडस्ट्रीमध्ये कोणतीही स्पष्ट नियमावली नाही. त्यामुळ त्या काळात खूप कठीण परिस्थिती होती. सिंगर्सना कोणताही करार दिला जात नव्हता, अनेकदा पैसेही दिले जात नव्हते. इतकंच नाही तर गाण्यात सिंगर्सना क्रेडिटही दिलं जात नव्हतं. त्या गाण्यावर आमचा काहीच हक्क नसतो, अशीच व्यवस्था होती. पण 2013 हे वर्ष सिंगर्ससाठी महत्त्वाचे ठरले. त्या वर्षी सिंगर्सना समजलं की कोण कोणाच्या बाजूने उभं आहे. आम्ही एकत्र येऊन आवाज उठवला. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काही बदल होऊ लागले,”अस तिनं सांगितले.

तसेच तिने स्वतंत्रपणे आपला मार्ग तयार करणाऱ्या कलाकारांच कौतुकही केले.“फिल्म इंडस्ट्रीच्या आधाराशिवाय स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांचा मला खूप आदर आहे, असं श्रेया घोषाल म्हणाली .

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

‘मला माहित नव्हते की अ‍ॅव्होकॅडो म्हणजे काय?’ अक्षय कुमारने सांगितला त्याचा आवडता पदार्थ