Tuesday, June 18, 2024

नुसता कहर! श्रुती मराठेच्या लेटेस्ट फोटोशूटने भर पावसात लावली आग; एकदा पाहाच

मराठी चित्रपटसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे या दिवसांत तिच्या पोस्ट्समुळे खूप चर्चेत आहे. एका पेक्षा एक फोटो शेअर करून, ती चाहत्यांना वेड लावण्यात कोणतीही कसर बाकी सोडत नाहीये. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहून, तिचे वेगवेगळे फोटोशूट या ठिकाणी शेअर करताना दिसते. नुकतेच तिने शेअर केलेले काही फोटो आता सोशल मीडियावर आग लावत आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

श्रुती मराठेने नेहमीप्रमाणेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या अदा कोणालाही तिच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेश्या आहेत. तुम्ही पाहू शकता की, यात श्रुतीने साडी परिधान केली आहे. सोबतच परफेक्ट असा मेकअप करून, अभिनेत्री पाण्यात भिजलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ती यामध्ये ज्याप्रकारे फोटोसाठी पोझ देत आहेत, ते पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झाले आहेत. तिचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडल्याचे दिसून येत आहे.

साडीमध्ये असूनही श्रुती यामध्ये खूपच हॉट दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने अतिशय लक्षवेधी असं कॅप्शनही याला दिलं आहे. कॅप्शनमध्ये श्रुती म्हणतेय की, “कभी बेपनाह बरस पड़ी कभी गुम सी हैं, ये बारिश भी कुछ कुछ
तुम सी है।” यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले की, “पावसात वणवा पेटला.” तर दुसरा म्हणतोय की, “पाण्यात आग लावलीस.” इतर युजरने कमेंट केली, “भर पावसात पण आग लावणार वाटतं.” या फोटोंवर चाहत्यांसोबत कलाकार मंडळी देखील प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

श्रुतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्यांनी मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम काम करून आपले नाव कमावले आहे. श्रुतीने मराठीसोबत तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम करून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

हे देखील वाचा