Thursday, April 25, 2024

अभिनेत्री श्रुती हासनने अकरा वर्षांपूर्वी सोडले होते वडिलांचे घर, आता कोरोना काळात करतेय आर्थिक समस्यांचा सामना

संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या साथीने त्रस्त आहे. देशभरातील लाखो लोकांना, याची लागण होत आहे. याचा रोजंदारीवरील मजुरांवर मोठा परिणाम होत आहे. लोकांच्या गरजा भागवण्यासाठी पैसे नाहीत. यावेळी बरेच लोक आर्थिक संकटातून जात आहेत. या यादीमध्ये सामान्य लोकांसह चित्रपटातील काही कलाकारदेखील समाविष्ट आहेत. ज्यांच्याकडे काम नाही, आणि ज्यांना गरजा भागवणे कठीण जात आहे. या यादीमध्ये अभिनेत्री श्रुती हासनचाही समावेश आहे. तिने सांगितले आहे की, ती आर्थिक संकटातून जात आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रुती म्हणाली की, ‘मी हे लपवू शकत नाही किंवा मी कोरोनाच्या साथीचा रोग संपेपर्यंत थांबू शकत नाही.’ तिने हे कबूल केले की, ‘यावेळी शूट करणे खूप अवघड आहे, परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा काम करणे देखील महत्त्वाचे आहे.’

श्रुती पुढे म्हणाली, ‘मी खोटे बोलणार नाही. मास्कशिवाय सेटवर राहणे, खूप धोकादायक आहे, परंतु मला पुन्हा कामावर जावे लागेल. कारण इतर लोकांप्रमाणेच मलाही आर्थिक समस्या आहेत. जेव्हा शूट सुरू होईल, तेव्हा मला शूटसाठी बाहेर जावे लागेल. तसेच माझी दुसरी वचनबद्धता देखील मला पूर्ण करावी लागेल.’

श्रुती पुढे म्हणाली, ‘आपण सगळे वेगवेगळ्या प्रकारे पैसे मिळवतो, पण सर्वांना बिले द्यावीच लागतात. त्यासाठी मला पुन्हा कामावर जावे लागेल.’ स्वत: ला स्वतंत्र स्त्री म्हणून वर्णन करताना ती म्हणाली, ‘मलाही काही मर्यादा आहेत, माझ्या मदतीसाठी आई, बाबा नाही. ११ वर्षापूर्वी वडिलांचे घर सोडून, आपले जीवन स्वत: बनवल्यामुळे मी खूप आनंदी आहे.’

श्रुती म्हणाली की, ‘मी माझा स्वतःचा निर्णय घेतला आहे, तो बरोबर असुदेत की नाही. असे काही हुशार लोक आहेत की, ज्यांनी साथीच्या आधी कार, आणि घर यांसारख्या मोठ्या वस्तू विकत घेतल्या नाही. परंतु मी हे सर्व सुरू होण्यापूर्वीच, घर विकत घेतले होते. होय, मी आर्थिक समस्यांमधून जात आहे.’ श्रुतीने सांगितले की, ‘ती आपल्या घराचा हप्ता भरण्याचा प्रयत्न करत आहे.’

श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर श्रुती हासन लॉकडाउनपूर्वी वेब सीरिज, आणि तिचा आगामी चित्रपट ‘सालार’ यावर काम करत होती. या चित्रपटात श्रुतीसोबत प्रभासही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पडद्यावर या जोडीला बघायला चाहते आतुर झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…

हे देखील वाचा