×

‘मी कितीही चांगलं केलं…’, श्वेता तिवारीची लेक पलकने नेपोटिझ्मवर केली मोकळेपणाने चर्चा

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. पलकच्या पदार्पण चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनय विश्वात येण्यापूर्वी पलकचे दोन म्युझिक व्हिडिओ रिलीझ झाले आहेत. सेलेब्सच्या मुलांच्या पदार्पणाबाबत इंडस्ट्रीत नेपोटिझ्मबद्दल चर्चा रंगली आहे. अनेक सेलिब्रिटी यावर खुलेपणाने आपले मत व्यक्त करतात, तर अनेकांनी यावर मौन बाळगले आहे. श्वेताची मुलगी पलक हिने आता नेपोटिझ्मवर आपले मत मांडले आहे. ती म्हणाली की, पालक आपल्या मुलांना चांगले जीवन देण्यासाठी काम करतात. आपल्या मुलांना चांगले जीवन देणे हा पालकांचा हक्क आहे.

दिलेल्या एका मुलाखतीत पलक तिवारी म्हणाली की, “माझं म्हणणं आहे की, बाहेरील लोकांकडे कधी कधी दुर्लक्ष केले जाते. परंतु प्रत्येक गोष्टीचे तोटे असतात. मला वाटतं हे कोणाशी तरी जोडले गेल्याने घडतंय. या सगळ्याचं दडपण म्हणजे, प्रेक्षकांनी त्यांना ज्या प्रकारे प्रेम दिलं आहे. मला माहित आहे की, मी कितीही चांगलं केलं तरी लोक नेहमी विचार करतील की, माझी आई चांगली होती. ही अशी गोष्ट आहे, जी मी माझ्या आयुष्यात कधीही नाकारली नाही आणि मी कधी नाकारणारही नाही. (shweta tiwari daughter palak tiwari opens up on nepotism)

पलक आईबद्दल बोलली ‘असे’ काही
पलक पुढे म्हणाली, “मी तिचा एक भाग आहे, त्यामुळे मला तिच्यासारखे बनायचे आहे. मला खूप वेळ लागेल. पण माझ्या आईने लहानपणापासून खूप संघर्ष केला आहे.” पलक पुढे म्हणाली की, “मला एक गोष्ट सांगायची आहे की, लोक स्वीकार करोत किंवा न करोत. ज्यांनी माझ्या आईसारखे काम केले आहे, त्यांनी आपल्या मुलांना काहीही देऊ नये, हे योग्य आहे का? त्यांनी केलेले सर्व कार्य व्यर्थ गेले पाहिजे? आपले पालक या सर्व गोष्टी आपल्या मुलांना आरामदायी जीवन देण्यासाठी करतात.”

पलक तिवारी हार्डी संधूसोबत ‘बिजली बिजली’ या गाण्यात दिसली होती. अलीकडेच तिचा दुसरा म्युझिक व्हिडिओ ‘मांगता है क्या’ मध्ये ती आदित्य सील सोबत दिसली होती. ‘रोझी द केफ्रॉन चॅप्टर’ या चित्रपटातून ती यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post