मेहंदी है रचनेवाली, हाथों में गहरी लाली… पाहा अभिनेत्री मिताली आणि अभिनेता सिद्धार्थ यांच्या मेहंदी सोहळ्याचे झक्कास फोटो


सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यातील गोड व्यक्ती म्हणजेच मिताली मयेकर. साखरपुड्यानंतर या दोघांच्या लग्नाची उत्सुकता त्यांच्या फॅन्सला लागली आहे. आता अखेर तो दिवस आला आहे. सिद्धार्थ आणि मिताली आज विवाहबंधनात अडकत आहेत. तत्पूर्वी त्याचे मेहेंदीचे फंक्शन पार पडले. मितालीने तिच्या मेहेंदीचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यांच्या मेहेंदी समारंभातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या दोघांचे लग्नापूर्वीचे सर्व विधी उत्तम पद्धतीने संपन्न झाले. त्यांनी त्यांच्या ग्रहमुख विधीचे आणि सिद्धार्थच्या सोड मुंजीच्या विधीचे फोटो सोशल मीडियाववर पोस्ट केले होते. नुकताच या दोघांच्या हळदीचा समारंभ धुमधडाक्यात साजरा झाला. तीन वर्षांपूर्वी ‘व्हॅलेंटाईन डे’ला या दोघांनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. जानेवारी २०१९ मध्ये सिद्धार्थ आणि मितालीचा साखरपुडा पार पडला होता.

सिद्धार्थ आणि मिताली यांचा विवाहसोहळा पुण्यात पार पडणार आहे. जवळच्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. त्याच्या हळदीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत सिद्धार्थ-मितालीनं ‘वाजले की बारा’, ‘शांताबाई’ तसंच ‘जपून दांडा धर’ अशा गाण्यांवर धम्माल डान्स केला.

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.