‘हे’ गाणे गायला त्यावेळी आशा भोसले यांना वाटत होती भीती; इंडियन आयडलच्या मंचावर स्वत: केला खुलासा


सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ या शोमध्ये दर आठवड्याला काही ना काही इंटरेस्टिंग घडत असते.‌ यावेळी शोमध्ये गायिका आशा भोसले या पाहुण्या म्हणून येणार आहेत. यावेळी त्यांनी त्यांची गाणी आणि गाण्याच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. आशा दीदी यांनी १९६६ मध्ये आलेल्या ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘आजा आजा मैं हू प्यार तेरा’ या गाण्याबाबत चर्चा केली. त्यांनी सांगितले की, या गाण्याचा सराव करताना त्यांच्यासोबत अशी एक घटना घडली होती, त्यानंतर त्या विचार करत होत्या की, हे गाणे गायले पाहिजे की नको?? (Singer Aasha bhosale share her experience on Aaja aaja mai hu pyar tera on indian ideol stage)

या विकेंडला गायिका आशा भोसले या ‘इंडियन आयडल १२’च्या मंचावर स्पर्धकांच्या गाण्याचा आनंद घेताना दिसणार आहेत. या शोमध्ये निहाल टौरोने आशा दिदिंचे प्रसिद्ध ‘आजा आजा मैं हू प्यार तेरा’ हे गाणे गायले. हे गाणे ऐकल्यानंतर आशा दीदींनी या गाण्याच्या आठवणी शेअर केल्या. त्यांनी सांगितले की, त्यावेळी त्या या प्रश्नात अडकल्या होत्या की, त्यांना हे गाणे गायले पाहिजे की नको??

त्यांनी सांगितले की, “हे गाणे खूप अवघड आहे. आरडी बर्मन साहेब एक दिवस घरी आले. त्यांनी मला हे गाणे गाण्याचा आग्रह केला. जेव्हा मी त्यांना ‘ओह आजा आह आह’ प्ले करताना ऐकले तेव्हा मी हैराण झाले होते. कारण मला वाटले होते की, मी हे नाही करू शकत. तेव्हा मी त्यांना सांगितले होते की, मी चार ते पाच दिवसानंतर हे गाणे गाण्याचा प्रयत्न करेल.”

आशा दिदिने पुढे सांगितले की, “मी या गाण्याच्या धूनचा माझ्या गाडीमध्ये इतक्या वेळा सराव केला की, एक दिवस माझा ड्रायव्हर वैतागला होता.” अनेक वर्षापूर्वीचा किस्सा सांगत आशा दीदी म्हणाल्या की, “एक दिवस आम्ही हाजी अलीला गेलो होतो. जिथे मी राहत होते, तिथे माझ्या ड्रायव्हरने विचारले की, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे का?? त्याला वाटले की, मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. हा एक मजेशीर किस्सा होता.” त्या गाण्यात आशा दीदीसोबत मोहम्मद रफी यांचा आवाज आहे.

आशा दीदीने पुढे सांगितले की, “या गाण्याबाबत त्यांनी जेव्हा लता दीदींसोबत चर्चा केली. तेव्हा त्या म्हणाल्या की, “तू विसरली आहेस की, तू मंगेशकर आहे. जा आणि गाणे गा. तू खूप चांगले करशील.” त्यावेळी हे गाणे खूप सुपरहिट झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.