ओहो! नेहा कक्करने बाथटबवर बसून दिले हटके पोझ; पती रोहनप्रती सिंगच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष


बॉलिवूडमध्ये एका पेक्षा एक गायिका आहेत. यातील अनेक गायिकांनी आपल्या स्वत:च्या हिमतीवर आज यश मिळवले आहे. या गायिकांमध्ये एक नाव असं आहे, जे आवर्जुन घेतलं पाहिजे. ते नाव म्हणजेच नेहा कक्कर होय. नेहा आज आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. तिने यादरम्यान अनेक हिट गाणी दिली आहेत. ती केवळ आपल्या गाण्यांमुळेच नाही, तर आपल्या स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्ससाठीही ओळखली जाते. तसेच ती सोशल मीडियावरही जबरदस्त सक्रिय असते. ती नेहमीच आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच आता तिचे काही फोटो चर्चेत आहेत. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. हे फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत. (Singer Neha Kakkar Bathtub Photos Goes To Viral On Social Media)

नेहाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती बाथटबमध्ये बसून हटके पोझ देत आहे. यादरम्यान ती बाथटबच्या आत नाही, तर बाथटबच्या बाहेर बसून पोझ देत आहे. तिने या फोटोशूटदरम्यान पांढऱ्या रंगाचे बाथरोब नेसले आहे. तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य चाहत्यांना घायाळ करत आहे.

हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सुप्रभात! शॉवर झाले आहे. चला दिवसाची सुरुवात करूया काही सकारात्मक- चहासोबत…”

नेहाच्या या फोटोंना चाहत्यांकडून जोरदार पसंती मिळत आहे. आतापर्यंत या फोटोला ९ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यासोबतच तिच्या या फोटोवर चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण कमेंट करत आहेत. विशेष म्हणजे तिच्या फोटोवर पती रोहनप्रीत सिंगने केलेली कमेंट लक्षवेधी आहे. रोहनप्रीतने कमेंट करत लिहिले की, “व्वा हाय! म्हणजे किती सुंदर!!!” त्याच्या या कमेंटलाही ३ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

यापूर्वीही नेहाच्या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. दुसरीकडे नेहाच्या आगामी कामाबद्दल चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते.


Leave A Reply

Your email address will not be published.