भोजपुरी स्टार समर सिंगचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; नीलम गिरीच्या हॉट अंदाजावर प्रेक्षक फिदा


भोजपुरी चित्रपटसृष्टीतील गायक आणि अभिनेते दरदिवशी आपल्या नवनवीन गाण्यांनी धमाल करत आहेत. त्यांची गाणी प्रदर्शित होता क्षणीच जोरदार व्हायरल होतात. यापैकीच एक स्टार म्हणजे समर सिंग होय. समर आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन गाणे घेऊन आला आहे. त्याच्या या नवीन गाण्याला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. (Singer Samar Singh Shilpi Raj And Neelam Giri Song Lagelu Jaan Maar Ho Release On Youtube)

गायक समर सिंगच्या या गाण्याचे नाव ‘लागेलु जान मार हो’ असे आहे. या गाण्यात त्याच्यासोबत ‘ट्रेंडिंग गर्ल’ नीलम गिरी आहे. हे गाणे समर सिंग आणि ‘ट्रेंडिंग सिंगर’ शिल्पी राज यांनी गायले आहे. ‘लागेलु जान मार हो’ हे गाणे वर्ल्डवाईड भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीझ केले आहे.

या गाण्यातील समर सिंग आणि नीलम गिरीच्या जोडीला आणि त्यांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. या गाण्यात समर सिंगने निळ्या रंगाचा कोट घातला आहे, तर नीलम गिरीने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. सोबतच सोनेरी रंगाच्या केसांनी नीलम प्रेक्षकांना घायाळ करत आहे. समर आणि नीलमचा हॉट अंदाज प्रेक्षकांना भलताच आवडत आहे.

भोजपुरीतील स्थानिक आणि गुणवत्तापूर्ण गाण्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रसिद्ध संगीत कंपनी वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीला ओळखले जाते. या कंपनीने समर सिंगच्या या गाण्याची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. तेव्हापासूनच प्रेक्षकांना या गाण्याची उत्सुकता लागली होती. समर सिंगचे गाणे प्रदर्शित होण्याच्या ११ तासांमध्येच या गाण्याला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्याचे बोल प्रभू विष्णूपुरी यांनी लिहिले आहेत. या गाण्याला संगीत विकास यादव यांनी दिले आहेत, तर आदिशक्ती स्टुडिओ बलियामध्ये या गाण्याची रेकॉर्डिंग केली आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे दिग्दर्शन रवी पंडित यांनी केले आहे. दुसरीकडे या गाण्याचे डीओपी (व्हिडिओ दिग्दर्शक) मंटू, कोरिओग्राफर ऋतिक, एडिटर दीपक पंडित आणि प्रॉडक्शन प्रमुख पंकज सोनी आहेत.

समर सिंग आणि नीलम गिरी यांची जोडी संगीतसृष्टीमधील यशस्वी जोडी समजली जाते. त्यांचे व्हिडिओ गाणे ‘हरदिया के छापी’ला ३० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. देशी स्टार समर सिंगचे हे गाणे ‘वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरी’ या यूट्यूब चॅनेलवरही प्रदर्शित झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा

-‘बापमाणूस!’, ‘पितृदिना’निमित्त सिद्धूची खास पोस्ट आली समोर; होतोय प्रेमाचा वर्षाव


Leave A Reply

Your email address will not be published.