नेहा कक्कर हिने गायलेलं गाणं ‘ओ सजना’ नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं फाल्गुनी पाठक हिचं ‘मैंने पायल हैं छनकाई’ या गाण्याचा रिमेक केला आहे. मात्र, हे गाणं प्रेक्षकांसोबत फाल्गुनीला देखील आवडले नाही. त्यामुळे नेहा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सोशल मीडियावरील नेहा आणि फाल्गुनी यांचा वाद चांगलाच पेटल्यामुळे आणखी एका गायिकेने या दोघींवर टीका करत ट्वीट केले आहे. चला तर जाणून घेऊया की, नेमकं कोणत्या गायिकेने या दोघींना टोला मारला आहे.
नेहा कक्कर (Neha Kakkar) हिने नुकतेच आपले नवीन अल्बम साॅंग ‘ओ सजना’ (O Sajna) प्रदर्शित केलं आहे, पण या गाण्याचा रिमेक फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) हिला अजिबात आवडला नाही. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंवरून एका चाहत्याची पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भाव व्यक्त केले होते. ज्यामुळे या दोघींमध्ये चांगलाच वाद पेटला होता. यामध्येच तिसरीच गायिका सोना मोहापात्रा (Sona Mohapatra) हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या दोघींवर आणि बॉलिवूडवर टीका करत एक ट्वीट केले आहे, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
सोना मोहापात्रा या गायिकेने नेहा कक्कर, फाल्गुनी पाठक आणि बॉलिवूडवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना खोचक टीका केली आहे. तिच्या या ट्वीटने वादाला वेगळेच वळण दिले आहे. तिने ट्वीट करत लिहिले आहे की, “मी फक्त आशा करू शकते की, संगीताला शॉर्टकट करून तुम्ही सर्जनशील आणि चित्रपट निर्माता यांना मारत आहात. रिमेक, रिमिक्स अलीकडेच #FalguniPathak प्रसिद्ध असलेला एकत्रित प्रतिसादाला लक्षात घ्या. प्रिय भारत अशा प्रकरणात अधिक जोमाने उभे राहा.”
I can only hope that the music labels & #Bollywood film producers killing the creative community & creators by commissioning short-cuts; remakes, remixes take note of the public backlash on the recent #FalguniPathak hit. Also, dear #India , do stand up more often to such ????????♥️
— Sona Mohapatra (@sonamohapatra) September 26, 2022
माध्यमांतील वृत्तांनुसार, फाल्गुनी पाठक हिने एका मुलाखतीदरम्यान नवीन गाण्याबद्दल प्रतिक्रिया देत असताना सांगितले की, “मी हे रिमेक गाणे दोन- तीन दिवसांपूर्वी पाहिले आहे. हे गाण्याला पहिल्यांदा पाहिल्यावर माझी प्रतिक्रिया चांगली नव्हती. मला उलटी आल्यासारखे झाले होते.” सोबतच तिने हेही सांगितले की, “पूर्वीच्या गाण्याचा व्हिडिओ एकदम साधा आणि गरीब होता. मात्र, आताच्या व्हिडिओमध्ये गाण्याचा सत्यानाश केला आहे. जर माझ्या गाण्यासाठी माझे चाहते माझी बाजू घेत असतील, तर मी शांत बसून कसे चालेल.”
फाल्गुनीने या गाण्याविरोधात कायदेशीर कारवाई करू शकत नसल्याची खंतही व्यक्त केली. कारण, तिने कितीही प्रयत्न केला, तरी ती नेहा कक्करविरोधात कायदेशीर कारवाई करू शकत नाही. कारण तिच्याकडे या गाण्याचे कोणतेही अधिकार नाहीत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टेलिव्हिजन दुनियेत अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या अर्चनाने पळून केले होते लग्न, ब्राह्मणाला रात्री 11 वाजता…
रेखा नव्हे अमिताभ बच्चन यांना ‘या’ बंगाली मुलीने लावले होते वेड, वाचा पहिल्या प्रेमाचा रंजक किस्सा