Thursday, July 18, 2024

तुफान कॉमेडीसह सामाजिक संदेश देणारे ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, एकदा पाहाच

आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्म लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. कोरोनाच्या काळापूर्वी प्रेक्षकांवर ओटीटीचा प्रभाव लक्षणीय नव्हता, परंतु या रोगानंतर बंद पडलेल्या चित्रपटगृहांमुळे या प्लॅटफॉर्मला विस्तारण्याची चांगली संधी मिळाली. चित्रपटगृहे बंद असूनही ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे सतत मनोरंजन होत आहे. हेच कारण आहे की आता बहुतेक लोकांना ओटीटी आणि त्यावरील विविध चित्रपट आवडू लागले आहेत. जवळजवळ प्रत्येक चित्रपट आणि वेबसिरीज आता ओटीटीवर उपलब्ध आहेत. नुकताच नेटफ्लिक्सवर अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) स्टारर दसवीं चित्रपट प्रदर्शित झाला, त्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पाहूया ओटीटीवर गाजलेले असेच काही तुफान कॉमेडी चित्रपट.

बाला
२०१९ मध्ये आलेला ‘बाला’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यामी गौतम  (Yami Gautam)आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली. टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित हा विनोदी चित्रपट अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. (social comedy movies available on ott bala badhai ho shubh mangal savdhan)

गूड न्यूज 
अक्षय कुमार (Akshay Kumar)  आणि करीना कपूर (Kareena Kapoor) स्टारर ‘गुड न्यूज’ चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला होता. IVF तंत्रावर आधारित हा चित्रपट त्या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक होता. अक्षय आणि करीना व्यतिरिक्त या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी देखील दिसले होते. राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

बधाई हो
मध्यमवयीन जोडप्याच्या गरोदरपणावर आधारित ‘बधाई हो’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळाला होता. आयुष्मान खुराना, नीना गुप्ता आणि गजराज राव अभिनीत हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले होते. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर वर उपलब्ध आहे.

शुभमंगल सावधान
आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली. इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येने त्रस्त असलेल्या एका माणसावर आधारित हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तामिळ चित्रपट ‘कल्याण समयाल साधम’चा रिमेक होता, ज्याचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले. ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर हा चित्रपट पाहता येईल.

विकी डोनर
आयुष्मान खुराना आणि यामी गौतम अभिनीत हा चित्रपट वंध्यत्वाच्या विषयाभोवती फिरतो. ‘विकी डोनर’ चित्रपटाने शुक्राणू दान आणि वंध्यत्वाचा मुद्दा विनोदी पद्धतीने ठळकपणे मांडला होता. शुजित सरकार दिग्दर्शित हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. हे अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा