Friday, December 1, 2023

हाय हाय फॅशन! चक्क डायनिंग टेबलच्या कव्हरपासून उर्फीने बनवला ड्रेस; युजर्स म्हणाले, ‘कोरोना पुन्हा…’

बिग बॉस ओटीटी नंतर प्रसिद्ध झालेली उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि बोल्ड आउटफिट्ससाठी ओळखली जाते. फराह खान अली, चित्रा वाघ आणि इतर तिच्या असामान्य फॅशन सेन्सबद्दल तिच्यावर टीका करताना दिसतात. तर दुसरीकडे, रणवीर सिंग, मसाबा गुप्ता यांसारखे इतर तिचे केस, मेकअप आणि डिझाइनचे कौतुक करतात. अलीकडेच, उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे.

आज म्हणजेच गुरुवारी (दि. 2 मार्च)ला उर्फी प्लास्टिकच्या ट्रांसपेरेंट ड्रेसमध्ये दिसली. या व्हिडिओमध्ये उर्फीने काळ्या मोनोकिनीवर ट्रांसपेरेंट प्लास्टिक स्कर्ट परिधान केला हाेता. उर्फीने ग्लॉसी मेकअप, केसांमध्ये पोनीटेल, गोल कानातले आणि उंच टाचांसह तिचा लूक पूर्ण केला. या लूकमध्ये अभिनेत्रीने पॅपराझींना जबरदस्त पोजही दिल्या आहेत. एवढेच नाही, तर सोशल मीडियावर तिचा लूक चाहत्यांमध्ये खळबळ माजवत आहे.

यावर सोशल मीडिया युजर्सकडून भिन्नभिन्न प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “कोरोना पुन्हा आला आहे का?”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, “स्कर्टऐवजी फॉइल गुंडाळ” उर्फीचा ड्रेस अतरंगी असला तरी, तिची स्टाईल घायळ करणारी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकतीच उर्फी जावेद डर्टी मॅगझिनसाठी शूटिंग करताना दिसली. यादरम्यान, ती गुलाबी केस आणि नवीन- जुन्या डिझाइन मिक्स करून रिवीलिंग आउटफिट्समध्ये स्पॉट झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीचा जन्म 15 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. ‘बडे भैया की दुल्हनिय या चित्रपटातून तिने अवनी पंतच्या भूमिकेत पदार्पण केले. यानंतर ती 2017 मध्ये ‘चंद्र नंदिनी’ आणि नंतर ‘मेरी दुर्गा’मध्ये काम करताना दिसली. उर्फीने ‘बेपन्ना’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ सारख्या शोमध्येही काम केले, परंतु तिला खरी ओळख बिग बॉस ओटीटी मधून मिळाली.(social media influencer urfi javed wore a dining table cover dress watch video)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘प्राजु गुलाबापेक्षाही खूप सुंदर आहे’ म्हणत फॅनने घातली चक्क प्राजक्ता माळीला लग्नाची मागणी

रजनीकांत यांनी केली त्यांच्या 170 व्या चित्रपटाची घोषणा, टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित सिनेमात दिसणार थलाइवा

हे देखील वाचा