×

साखरपुड्याच्या वृत्तावर सोनाक्षी सिन्हाने सोडले मौन, अखेर ‘ती’ गुड न्यूज देत केला मोठा खुलासा

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आजकाल तिच्या रिलेशनमुळे सतत चर्चेचा विषय बनत असते. तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती, त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या रिलेशनवरून चर्चा सुरू झाल्या होत्या. सोनाक्षीने एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये एका व्यक्तीने तिचा हात पकडला आहे आणि दुसरा हात तिने तिच्या चेहऱ्यावर धरला आहे, ज्यामध्ये अंगठी घातलेली दिसत होती. हातातली ही अंगठी फ्लॉंट करताना सोनाक्षीचा फोटो व्हायरल झाला होता. सोनाक्षीचा साखरपुडा झालाय, असं सगळ्यांना वाटत होतं. पण आता अभिनेत्रीने स्वतः या गुपितावरून पडदा उचलला आहे. तिने आता तिच्या त्या फोटोमागचे कारण सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षीने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हसताना दिसत आहे. तसंच ती यात तिचे नखंही फ्लॉंट करताना दिसत आहे. सोनाक्षीने या पोस्टद्वारे सांगितले आहे की, ती लग्न करत नाहीये, तर स्वत:चा एक ब्रँड घेऊन आली आहे. (sonakshi sinha launches her own brand amid engagement rumours)

सोनाक्षीने लॉन्च केला ब्रँड
सोनाक्षीने स्वतःचा ब्रँड लॉन्च केला आहे. हा ब्रँड नखांसाठी आहे. याची माहिती सोनाक्षीने तिच्या सोशल मीडियावरद्वारे दिली आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, “ओके ओके, मला वाटते की मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे. खूप हिंट दिल्या, पण एकही खोटे बोलले नाही. हा माझ्यासाठी मोठा दिवस आहे, कारण मी माझा ब्रँड लॉन्च करणार आहे.”

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षीने पुढे लिहिले की, “माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. कारण अखेर मी उद्योजकाच्या जगात प्रवेश केला आहे आणि ही आनंदाची बातमी मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आणखी थांबू शकत नव्हते. मी माझे नवीन प्रेम तुम्हाला दाखवत आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.”

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
सोनाक्षीच्या पोस्टवर चाहते अभिनंदन करत आहेत. केवळ चाहतेच नव्हे, तर अनेक सेलिब्रिटीही तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post