बिग बॉस मराठीच्या घरात भरली पत्रकार परिषद, स्पर्धकांवर केला प्रश्नांचा भडिमार


बिग बॉस मराठी  हा सध्या टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेत असणारा शो आहे. हा शो संपायला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येकजण त्यांचा खेळ खेळत आहेत. घरात टॉप ६ स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. तसेच या आठवड्याच्या मधे एकदा एलिमिनेशन होणार आहे आणि घरात टॉप ५ स्पर्धक राहणार आहेत. आता खेळ तर बऱ्यापैकी संपला आहे. स्पर्धकांना आता त्यांचा वैयक्तिक खेळ खेळावा लागणार आहे. तसेच अनेक गोष्टीचा सामना करावा लागणार आहे.

अशातच या शोमधील शेवटच्या आठवड्यात घरात पत्रकार परिषद भरली आहे. त्यावेळी अनेक पत्रकार घरात गार्डन एरियामध्ये आलेले असतात. त्यावेळी घरातील स्पर्धकांमध्ये आणि पत्रकारांमध्ये काच असते आणि ते बाहेरून स्पर्धकांना अनेक प्रश्न विचारतात. एका नंतर एक असे सगळेजण प्रश्नांचा भडीमार करत असतात. (Bigg Boss Marathi 3 : press conference arrange in BBM house)

यावेळी एक पत्रकार जयला प्रश्न विचारतो की, “प्रत्येक टास्कमध्ये समोरच्या स्पर्धकाची लायकी काढणे गरजेचे असते का?” यावर जय उत्तर देतो की, “या घरात सगळ्यांनीच एकमेकांची लायकी काढली आहे, परंतु मी बोलतो म्हणून सगळ्यांना असे वाटते की, जय दुधाने जास्त करतो.”

यानंतर आणखी एक पत्रकार विशालला विचारते की, “जर तुम्हाला सौंदर्याबाबत काय सांगायचे नव्हते तर तुम्ही तिचा विषय का काढला?” तसेच मीराला ते विचारतात की, “तुम्ही असे म्हणालात की, तुम्ही मरणाच्या दारातून परत आला आहात, तर नेमक तुमच्यासोबत असं काय घडलं‌ होत?” असे अनेक प्रश्न ते घरातील या टॉप ६ स्पर्धकांना विचारत आहेत. तसेच सगळेजण त्यांना उत्तर देखील देत आहेत.

बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले २६ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता या पर्वाचा विजेता कोण होईल हे जाणून घेण्यासाठी सगळे खूप उत्सुक आहेत. तसेच विशालने तिकीट टू फिनाले मिळवून टॉप ५ मध्ये त्याची जागा बनवली आहे.

हेही वाचा :

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी

नव्या वर्षात महेश मांजरेकरांचा नवा मराठी चित्रपट, ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’

‘जिंकूनच ये’, मीनल शहाला प्रोत्साहन देत, ‘या’ व्यक्तीने दिला खास मेसेज 

 

 


Latest Post

error: Content is protected !!