Friday, March 31, 2023

‘बिग बॉस’ फेम सोनाली पाटील करणार राजकारणात प्रवेश? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

‘बिग बॉस’ (Bigg Boss) हा टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असणारा शो आहे. या शोची लोकप्रियता खूप आहे. मराठी, हिंदी, तामिळ अशा अनेक भाषांमध्ये हा शो सुरु आहे. मराठीमध्ये या शोने ३ पर्व पूर्ण केले आहेत. या शोला प्रेक्षकांची जोरदार प्रतिक्रिया देखील मिळत आहे. या शोचा चौथा सीझन देखील लवकरच येणार आहे. मागील तीन पर्वातील स्पर्धकांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे त्यांची खास अशी ओळख निर्माण झाली आहे. यातील तिसरे पर्व जरा जास्तच गाजले.

तिसरी पर्वात ग्रुप ‘बी’ खूप चर्चेत होता. अनेकांचा त्यांना सपोर्ट देखील मिळत होता. यातील अभिनेत्री सोनाली पाटील (sonali patil) जोरदार चर्चेत आली होती. आपल्या कोल्हापूरच्या रांगड्या भाषेने आणि शैलीने तिने अनेकांशी मने जिंकून घेतली होती. त्यामुळे अनेकांना ती आवडते. ती ही स्पर्धा जिंकू शकली नाही, परंतु तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले.

सोनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगेळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती नेहमीच प्रेक्षकांशी जोडून राहत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो खूप आवडतात. अशातच सोनालीने एक पोस्ट शेअर केली आहे, जी साध्यास सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय बनत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Patil (@sonale_paatil42)

तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. यावर तिने सगळा साज शृंगार केला आहे. तसेच तिने प्रेक्षकांना एक हात केला आहे आणि पोझ देऊन उभी आहे. ही पोस्ट शेअर करून तिने लिहिले आहे की, “थोड्या वेळासाठी फोटो पाहून असं वाटलं आपण राजकारणात जावं.”

तिच्या या पोस्टवर अनेकांच्या कमेंट येत आहे. तिचा हा लुक आणि पोस्ट सगळ्यांना आवडला आहे. सोनालीने याआधी ‘देवमाणूस’ या मालिकेत काम केले आहे. तसेच बाकी अनेक मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘ह्याच्या पर्सनॅलिटीत काय बी नाय’, प्रथमेश परबबाबत ‘हे’ काय बोलून गेला दिग्गज अभिनेता
राशीभविष्य सांगून सांगणाऱ्या भगरे गुरुजींच्या लेकीला पहिले का? बोल्डनेसने लावते सोशल मीडियावर आग
‘जीव ह्या रिक्ततेचा अर्थ लावत बसला’, नागराज मंजुळेंची पोस्ट चर्चेत

 

हे देखील वाचा