सोनू सूदने थ्रोबॅक फोटो शेअर करत दिला मॉडेलिंगच्या दिवसातील आठवणींना उजाळा; चाहत्यांनाही आवडला अभिनेत्याचा लूक

Sonu Sood share a throw back photo of his modeling time


कोरोना काळात लोकांना मदत करून बॉलिवूडमधील अभिनेता सोनू सूद ‘देवदूत’ बनला आहे. कधी तो लोकांना मदत केल्यामुळे चर्चेत असतो, तर कधी त्याच्या वागणूकीमुळे चर्चेत असतो. मागील काही दिवसात त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये लोकं त्याच्या फोटोला दुधाने अभिषेक घालत होती. यावर त्याने सगळ्यांचे आभार मानून सांगितले होते की, तुम्ही हे दूध एखाद्या गरजू व्यक्तीला द्या. अशातच त्याचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. जो बघता बघता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याने शेअर केलेले हे फोटो मुंबईत जेव्हा तो मॉडेलिंग करत होता, तेव्हाचे आहेत.

सोनू सूदने हे फोटो शेअर करून कॅप्शन‌ दिले की, “मुंबईमधील मॉडेलिंगच्या दिवसातील एक थ्रो बॅक फोटो.” या फोटोमध्ये त्याचे लूकबद्दल बोलायचं झालं, तर त्याने जीन्ससोबत एक लाँग कोट घातला आहे. एका फोटोमध्ये तो भिंतीला टेकून पोज देत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो हातात मोबाईल घेऊन पोज देत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचे हे फोटो खूपच आवडले आहेत. सगळेजण ‘सुंदर’ आणि ‘सुपर्ब’ अशा कमेंट करून त्याच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

सोनू सूद हा अनेकांना मदत करत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्याचा फोटो मॅगझिन स्टार डस्टच्या कव्हर पेजवर आला होता. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले होते की, “एक वेळ अशी होती जेव्हा मी ऑडिशनसाठी माझा फोटो पाठवला होता आणि स्टार डस्टने तो फोटो रेजेक्ट केला होता. आज त्यांनी माझ्या फोटोला कव्हर पेजवर जागा दिली आहे.”

सोनू सूदने लोकांच्या मदतीसाठी सोनू सूद फाउंडेशन नावाची त्याची संस्था स्थापन केली आहे. या द्वारे तो लोकांची मदत करतो. त्याने ऑक्सिजन सिलेंडर, आयसीयू बेडसाठी एक हेल्पलाईन नंबर देखील दिला आहे. यासोबतच तो टेलिग्राममुळे सर्वांशी जोडून राहिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.