Saturday, September 7, 2024
Home टॉलीवूड निखिल सिद्धार्थने केली ‘कार्तिकेय 3’ची घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

निखिल सिद्धार्थने केली ‘कार्तिकेय 3’ची घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

दाक्षिणात्य अभिनेता निखिल सिद्धार्थचा ‘कार्तिकेय २’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. साऊथसोबतच या चित्रपटाने हिंदी व्हर्जनमध्ये देखील चांगला व्यवसाय केला. ही फ्रेंचायझी पसंत करणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्याने या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केली आहे.

दिग्दर्शक चंदू मोंडेती चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याची पुष्टी अभिनेत्याने केली आहे. चित्रपटाबद्दल अपडेट देताना, निखिलने X वर लिहिले, “डॉ. कार्तिकेय लवकरच एक नवीन साहस शोधत आहे…” या पोस्टमध्ये त्याने चित्रपटाच्या दिग्दर्शकालाही टॅग केले आहे.

अभिनेत्याच्या या पोस्टनंतर चाहते चांगलेच उत्सूक झाले आहेत. त्याच्या या वक्तव्यावरून लोकांचा अंदाज आहे की त्याला आगामी चित्रपटात जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव मिळेल. चाहते सोशल मीडियावर विविध कमेंट करून आपला आनंद व्यक्त करत आहेत.

या चित्रपटाचा स्केल मागील दोन चित्रपटांपेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा आहे. सध्या या चित्रपटाच्या कथानकाबद्दल आणि कलाकारांबद्दल कोणतेही अपडेट समोर आलेले नाही, तरीही लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

निखिल सिद्धार्थ शेवटचा 2023 मध्ये गॅरी बीएच दिग्दर्शित ॲक्शन-थ्रिलर ‘स्पाय’ मध्ये दिसला होता. त्याच्या कार्तिकेय 2 या चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा कमी बजेटचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटाने देशांतर्गत तिकीट खिडकीवर 86.75 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने केवळ हिंदी भाषेत 31.35 कोटी रुपयांची कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

तृप्ती डिमरीने सांगितली सौंदर्याची व्याख्या; म्हणाली, ‘आत्मविश्वासी स्त्रीपेक्षा सुंदर काहीही नाही’
श्रीदेवीची आठवण काढत बोनी कपूर भावूक; म्हणाले, ‘वाईट काळात माझी पत्नी माझ्यासोबत उभी राहिली’

हे देखील वाचा