खूप कमी वयात स्वर्गवासी झालेल्या अभिनेत्री, त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेली एक नजर


टॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे बॉलिवूड पेक्षा देखील खूप लोकप्रिय झालेत. तसेच असे काही कलाकार देखील आहेत जे आजही बॉलिवूडवर त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करतात आणि काही अशा अभिनेत्री देखील आहेत, ज्यांनी संपूर्ण देशभर नावं कमावले आहे. त्यामध्ये स्मिता सिल्कपासून ते दिव्या भारतीपर्यंत टॉलिवूडमध्ये अशा अभिनेत्री होत्या, ज्यांनी देशभरातील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात जागा निर्माण केली. परंतु खूप कमी वयातच हे जग सोडून गेल्या. चला तर जाऊन घेऊया या कलाकारांबद्दलच्या काही खास गोष्टी.

सौंदर्या
सौंदर्या ही सुपरस्टार होती. तिने ‘सुर्यवंशम’ चित्रपटात मुख्य भूमिका निभावली होती. तिचा वयाच्या 27 व्या वर्षीचं मृत्यू झाला. सन 2004 मध्ये बेंगळुरू जवळ विमानाच्या अपघातात तिचा मृत्यू झाला आणि ती हे जग सोडून गेली. सगळ्यात दुःखाची बाब ही की सौंदर्या ही तेव्हा गरोदर होती. त्या वेळेस ती भारतीय जनता पार्टी आणि तेलगू देसम पार्टीच्या उमेदवारीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चालली होती, तेव्हाच ही दुदैवी घटना घडली.

दिव्या भारती
दिव्या भारती हिने 13 वर्षाची असताना साऊथ च्या एका चित्रपटाततून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. 1993 मध्ये दिव्या मध्यरात्री अपार्टमेंटच्या बिल्डिंगवरून खाली पडली, तेव्हा तिचा जागीच मृत्यू झाला. त्या वेळेस ती फक्त 19 वर्षांची होती. परंतु तो अपघात होता की आत्महत्या हे कोडे अजूनही सुटले नाही.

प्रत्यूषा
सगळ्यांच्या आठवणीत आजही असलेला प्रसंग म्हणजे प्रत्यूषाचा मृत्यू. तिने वयाच्या 21 व्या वर्षी आत्महत्या केली होती. प्रत्यूष्या ही ‘सिध्दार्थ रेड्डी’सोबत रिलेशनमध्ये होती. त्या दोघांनीही 2002 मध्ये एकत्र विष पिले होते. त्यात प्रतूष्याचा मृत्यू झाला. पण सिध्दार्थ मात्र वाचला. सिध्दार्थच्या घरचे या लग्नाला परवानगी देत नव्हते म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

आरती अग्रवाल
भारतीय आणि अमेरिकन अभिनेत्री आरती अग्रवाल ही तेलुगु सिनेमातील एक नावाजलेली अभिनेत्री होती. आरतीचा वयाच्या 31 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला होता.

स्मिता सिल्क
साऊथच्या चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड अंदाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता सिल्क. तिने वयाच्या 36 व्या वर्षी विष पिऊन स्वत:च आयुष्य संपवलं होतं. सन 1996 मध्ये झालेल्या तिच्या मृत्यूचा धक्का बॉलिवूड सोबतच संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीला बसला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ
-‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनीपासून ते करीना कपूरपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी केलंय विवाहित पुरुषांशी लग्न; वाचा कोणाकोणाचा आहे समावेश
-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते
-‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात
-द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?


Leave A Reply

Your email address will not be published.