जाणून घ्या एक यशस्वी गायकापासून सुरू झालेला आणि राजकारणापर्यंत पोहचलेला बाबुल सुप्रियो यांचा प्रवास


एक पार्श्वगायक, लाइव्ह कलाकार, सूत्रसंचालक, अभिनेते आणि राजकारणी अशी ओळख असलेले बाबूल सुप्रियो आज (१५ डिसेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. नव्वदच्या दशकात बाबूल यांनी पार्श्वगायक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. हिंदी आणि ओडिसा भाषेतील त्यांची गाणी सुपरहिट ठरली आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी अजून ११ वेगवेगळ्या भाषेत गाणी गायली आहेत.

सुप्रियो सुरुवातीला एका बँकेमध्ये नोकरी करत होते. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ गायनासाठी देण्याचे ठरवले. १९९२ पासून त्यांनी बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी धडपड करण्यास सुरूवात केली. १९९४ मध्ये त्यांनी ‘प्रेमयोग’ चित्रपटासाठी ‘जिंदगी चार दिन की’ हे गाणं गायले. सुप्रियो यांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘सुन सजना तेरे बीन’, ‘परदेसिया’, ‘हमारी शादी’ में यांसारखी अनेक सुपरहिट हिंदी गाणी त्यांनी गायली. या हिंदी सुपरहिट गाण्यांबरोबरच ‘प्रेमेरी रेलगाडी’, ‘केरे नीली’, ‘आहा मोरी सुंदरी’ ही बंगाली गाणीदेखील बरीच गाजली.

बाबूल सुप्रियो यांनी २०१४ मध्ये हे राजकारणात प्रवेश केला. त्यांना भाजपच्या वतीने निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. मोदी सरकारच्या काळात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि शहरी विकास मंत्री या पदांचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर त्यांनी ३१ जुलै २०२१ रोजी राजकारण सोडण्याची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यांनी भाजपला सोडचिट्ठी देत १८ सप्टेंबर २०२१ रोजी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बाबूल सुप्रियो गायलेल्या सुपरहिट गाण्यांपैकी काही गाण्यांबद्दल आपण जाणून घेऊया- सलमान खान आणि अरबाज खान यांच्या ‘हॅलो ब्रदर’ या चित्रपटातील बाबूल यांनी गायलेल्या ‘हटा सावन की घटा’ या गाण्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यांच्या या जबरदस्त गाण्यावर अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सलमान खान यांनी त्यांच्या डान्सचा जोरदार तडका देखील लावला.

आजही लोकप्रिय असलेले ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील ‘दिल ने दिल को पुकारा’ हे गाणंदेखील बाबूल सुप्रियो यांनी गायलेले आहे. हे गाण आजही प्रेक्षकांच्या आवडीचं आहे.

बिपाशा बासु आणि इरफान खान यांच्या मुख्य भुमिकेतील ‘गुनाह’ चित्रपटातील ‘हमने तुमको दिल ये दे दिया’ हे गाणंदेखील बाबूल सुप्रियो यांनी अल्का याग्निक यांच्यासोबत गायले आहे.

हेही वा


Latest Post

error: Content is protected !!