सिनेसृष्टीत अनेक कलाकार आहेत जे अध्यात्मिकतेवर विश्वास ठेवतात. त्यांना विचारल्याशिवाय आयुष्यात कोणतेही पाऊल उचलत नाही. कोणतेही काम करण्यापूर्वी ते त्यांच्या गुरूचा सल्ला घेतात. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते बॉलिवूड कलाकार जे त्यांच्या गुरूंच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करत नाही.
ऐश्वर्या राय
बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwaya rai bachchan) ही सत्य साईबाबांची खूप मोठी भक्त आहे. सत्य साईंच्या मृत्यूनंतर ऐश्वर्या खूप दुःखी झाली होती हे फार कमी लोकांना माहीत असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक मोठा निर्णय सत्यसाईंच्या सल्ल्यानंतरच घेत असे. तिने सल्यावरूनच बच्चन कुटुंबाची सून होण्याचा निर्णय घेतला.
संजय दत्त
बॉलिवूडचा संजू बाबा अभिनेता संजय दत्त (Sanjay dutt) आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख आध्यात्मिक गुरू रविशंकर यांना फॉलो करतो. तो अनेकदा श्री श्री रविशंकर यांना त्यांच्या आश्रमात भेट देतो. मीडियाने त्याला या भेटीबाबत विचारले असता त्याने ही खासगी बैठक सांगून प्रकरण पुढे ढकलले होते.
शिल्पा शेट्टी
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa shetty)वननेस युनिव्हर्सिटीच्या आचार्य भगवान आणि अम्मा यांच्यावर विश्वास आहे. एका पुस्तक प्रकाशन समारंभात शिल्पा म्हणाली, “मी जेव्हापासून वननेस युनिव्हर्सिटीमध्ये जायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. आम्हाला भगवान आचार्य, अम्मा आणि नमनजी यांचे आशीर्वाद मिळाले, केवळ मीच नाही तर माझे संपूर्ण कुटुंब भाग्यवान आहे.
शाहिद कपूर (Shahid kapoor)
अभिनेता शाहिद कपूर (Shahid kapoor) आणि त्याचे संपूर्ण कुटुंब गुरु राधा स्वामी सत्संग व्यास यांचे भक्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधास्वामींच्या सत्संगात शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला शाहिदचे वडील पंकज कपूर यांनी पसंत केले होते. वास्तविक, मीराच्या कुटुंबाचाही राधास्वामी गुरूंवर विश्वास आहे. त्यांच्या लग्नाच्या वेळी सत्संगाचे प्रमुखही उपस्थित होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सज्जन सिंग’ बनून अनुपम श्याम यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, अंतिम क्षणी केलाय आर्थिक तंगीचा सामना
चित्रपटांनी समृद्ध असणाऱ्या महेश भट्ट यांच्या करिअरला वादांमुळे लाभली काळी किनार
बिग ब्रेकिंग.! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी याच्यावर संतप्त जमावाची दगडफेक