६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला परवानगी, येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान रसिकांना मिळणार सुरेल अनुभूती

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होईल.

यंदाचे वर्ष पंडित भीमसेन जोशींचे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांनी सुरू केलेला हा महोत्सव यावर्षी साजरा व्हावा, अशी पंडितजींचे पुत्र श्रीनिवास जोशी यांची इच्छा होती. “इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत असताना सवाई गंधर्व संगीत महोत्सवालादेखील ती मिळावी. सर्व नियमांचे पालन करून आपण त्याचे आयोजन करू”, असे श्रीनिवास जोशी म्हणाले होते.

अजित पवारांनी आज सवाई गंधर्व संगीत महोत्सव भरवण्यास राज्य सरकारची परवानगी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर एक डिसेंबर पासून नाट्य आणि चित्रपट गृहांमधे प्रेक्षक संख्येचे कोणतेही बंधन असणार नाही. म्हणजेच शंभर टक्के क्षमतेने सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश देता येईल, असंदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली.

हेही वाचा-

Latest Post