×

‘या’ अभिनेत्याच्या विनोदावर संतापला पायलट, फ्लाइटमध्येच सुरू झाली जोरदार वादावादी

राज बब्बर (Raj Babbar) यांचा मुलगा आर्य बब्बरने (Arya Babbar) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याची विमानाच्या पायलटसोबत जोरदार वादावादी झाली. खरं तर, आर्य बब्बर वैमानिकाला आवडले नाही असे काहीतरी बोलला. वैमानिकाने आर्यला कॉकपिटमध्ये बोलावून त्याबद्दल विचारले. यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. आर्य आपल्या मित्रासोबत मस्करी करत असल्याचे सांगत होता. त्याचवेळी पायलटने सांगितले की, आर्यने त्याची खिल्ली उडवली आहे, जी योग्य नाही. आर्यने ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केली आहे.

पायलटला आर्यचा विनोद वाटला वाईट
आर्य बब्बरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खुद्द आर्यने रविवारी (२० फेब्रुवारी) हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आर्य फ्लाइटमध्ये आहे. तो सर्वांना अभिवादन करतो आणि सांगतो की, त्याने एक विनोद केला आहे. पायलटला कदाचित ते आवडले नाही आणि त्याला कॉकपिटमध्ये बोलावण्यात आले आहे.

आर्य पायलटकडे पोहोचतो आणि म्हणतो “सर, बोला.” यावर त्याला उत्तर मिळते, “तुम्ही आमची चेष्टा केली का?” आर्यने उत्तर दिले “नाही सर.” मी माझ्या मित्रासोबत मस्करी करत होतो. यावर पायलट म्हणतो की, “बरं मी काहीतरी वेगळं ऐकलं.” यावर आर्यने विचारले, “काय ऐकले?” पायलट म्हणतो की, “मी ऐकले, हा विमान चालवणार?” त्यावर आर्य म्हणतो की, “नाही हे मी नाही बोललो, मी माझ्या मित्राला सांगितले की भाऊ, तो आत्ताच आला आहे? यात काही चूक आहे का?” पायलट म्हणतो “नाही, मला फक्त जाणून घ्यायचे होते तुम्ही काय बोललात.”

व्हिडिओ शेअर करून एयरवेजला केले टॅग
आर्यने पायलटला विचारले की त्यात काही चुकले का? पायलट म्हणतो “नाही, चूक नाही पण चांगले नाही.” आर्य म्हणतो “तुम्हाला तुमची शक्ती अशी वापरायची आहे का?” तो विचारतो की विनोद करण्यात काही अडचण आहे का? पायलट म्हणतो की, “तुम्हाला काही अडचण असेल, तर तुम्ही मला सांगा.” आर्य म्हणाला, “तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही माझ्या सीटपर्यंत यायला पाहिजे होते.” अशाप्रकारे दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरू होता.

View this post on Instagram

A post shared by Mr. Babbar (@aaryababbar222)

आर्य पायलटला सांगतो की, तो हे प्रकरण हलक्यात सोडणार नाही. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले, “संवेदनशील पायलट, गो एअर लोकांना हसण्यासाठी दंडही करतात.”  त्याचबरोबर आर्य ‘बिग बॉस ८’ ची सह-स्पर्धक आणि अभिनेत्री मिनिषासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, मनिषाने याला स्पष्ट नकार दिला होता. त्यावेळी आर्य बब्बरला मिनिषाची माफी मागावी लागली होती

हेही वाचा :

Latest Post