मनोरंजन जगातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला तिचा भाऊ राकेश काटवेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यासह पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात अभिनेत्रीच्या भावाच्या मृतदेहाचे तुकडे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहेत.
द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, राकेश काटवेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, राकेशचे कापलेले डोके देवरगुडीहलच्या जंगलात सापडले, तर मृतदेहाचे उर्वरित तुकडे हुबळी आणि गदग रोडवर आढळले आहेत. त्याचबरोबर या हत्येप्रकरणी इतर ४ लोकांवरही आरोप करण्यात आले आहेत, तर शनायालाही हुबळी पोलिसांनी अटक केली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, पोलिसांना त्यांच्या तपासात दिसून आले की, राकेशच्या मृत्यूमध्ये त्याची बहीण शनायाचाही काही हात आहे. शनायाचे नियाज अहमद कटिगारशी अफेअर सुरू होते, हे राकेशला पसंत नसल्याचे चौकशीत उघडकीस आले. अशा परिस्थितीत कटिगारने राकेशला ठार मारण्याची योजना आखली.
असे सांगितले जात आहे की, ९ एप्रिलला शनाया तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळीला गेली होती, ज्यानंतर कटिगारसह त्याच्या इतर साथीदारांनी राकेशला मारले. हत्येच्या दुसर्या दिवशी, कटिगार व त्याच्या साथीदारांनी मृतदेहाचे बरेच तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या संपूर्ण प्रकरणात लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याशिवाय, शनायाने ‘इंदम प्रेमाम जीवनम’च्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. सन २०२१मध्ये, अलीकडेच ती ऍडल्ट कॉमेडी चित्रपट ‘ओंदू घनतेया काथे’मध्ये दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ट्विटरनंतर आता कंगनाने साधला इंस्टाग्रामवर निशाणा, म्हणाली ‘२०२४ निवडणुकीत भाजपला धोका’
-‘अवघ्या १५ दिवसांत कोरोनाने माझा जिवलग मित्र खाल्ला!’ प्रविण तरडेंची फेसबुकवर भावनिक पोस्ट










