वयाच्या दहाव्या वर्षी कुटूंबाच्याविरूद्ध जाऊन केले मॉडेलिंग; पुढे बनली बॉलीवूडची सुपरस्टार परंतू आज रहातेय एकटी


जेव्हा सामान्य कुटूंबातील मुले जेव्हा सिनेमात आपले करियर करण्याचा निर्णय घेण्याचा विचार करतात, तेव्हा येथील संघर्षाच्या गोष्टी ऐकून बऱ्याच वेळा पालक माघार घेण्यास सांगतात. पूर्वीच्या काळातील अनेक कुटुंबं अभिनयाच्या बाबतीत निर्णय घेताना अधिक कडक व्यवहार करत असे. अभिनेत्री रती अग्निहोत्री यांची परिस्थितीही काही वेगळी नव्हती.  80 च्या दशकाच्या अतिशय लोकप्रिय झालेल्या याच अभिनेत्रीच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

रती यांचा जन्म 10 डिसेंबर 1960 रोजी उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात झाला. त्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या. अगदी सक्रिय आणि सुंदर रतीला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते. पण तिचा हा छंद त्यांच्या कुटुंबियांना आवडत नव्हता. कदाचित रतीमध्ये दडलेल्या अभिनेत्रीला कुटुंबीय ओळखू शकले नव्हते.

कुटुंबातील सदस्यांविरूद्ध जाऊन रतीने आपल्या कारकिर्दीची सुरूवात तामिळ चित्रपटांमधून केली. 1979 मध्ये रतीचा पहिला ‘पुथिया वारपुगल’ आणि नंतर ‘निरम मराठा’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. तामिळ चित्रपटांमध्ये काम करत असतानाच रतीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

बॉलिवूडने रतीचं सगळं काही बदलून टाकलं. 1981 च्या ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटातील रतीच्या अभिनयाला इतकी पसंती मिळाली होती की त्या एका रात्रीत स्टार बनल्या. यानंतर रतीने मागे वळून पाहिले नाही. वयाच्या दहाव्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात करणार्‍या रतीने त्यानंतर अनेक वर्षे लोकांच्या मनावर राज्य केले.

1985 दरम्यान, जेव्हा रती यशाच्या शिखरावर होत्या तेव्हा त्या व्यावसायिक आणि आर्किटेक्ट अनिल विरवानी यांच्याशी त्या लग्नाच्या बंधनात अडकल्या. त्या दोघांना तनुज नावाचा मुलगा आहे. मात्र लग्नानंतर रती आणि त्यांचा नवरा यांच्यात मतभेद वाढू लागले आणि शेवटी त्यांच्यात घटस्फोट झाला. यशाच्या टोकाला जाऊनही रती आपल्या वैयक्तिक आयुष्यात एकट्याच राहिल्या.

६० वर्षीय रती यांनी २०१६मध्ये आलेल्या डिक्टेक्टर या तेलुगू सिनेमात शेवटचे काम केले. त्यानंतर त्या आजपर्यँत सिनेमात दिसल्या नाहीत. रतीचा मुलगा तनुज मात्र काही सिनेमा व वेबसिरीजमध्ये दिसला आहे. त्याने इनसाईड एज, पॉईझन, कोड एम व मसाबा मसाबा सारख्या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये काम केले आहे. तसेच तनुज लव्ह यु सोनियो, पुरानी जिन्स व वन नाईट स्टॅंडसारखे सिनेमेही केले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.