कॉमेडियन संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा हे नुकतेच काही दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नानंतरही प्रत्येक दिवशी ते दोघे त्यांचे फोटो आणि मजेशीर व्हिडिओ सातत्याने शेअर करत असतात. सुगंधा मिश्रा ही गानकोकिळा लता मंगेशकर यांची मिमिक्री करण्यासाठी लोकप्रिय आहे. सध्या सुगंधाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सुगंधा ही लग्नानंतर भोसले झाली आहे, तेव्हा तिने तिचा भोसले बनण्याचा अनुभव लता दीदींच्या आवाजात शेअर केला आहे.
सुगंधा मिश्रा लता मंगेशकर यांच्या आवाजात म्हणते की, “नमस्कार! मला लता दीदींच्या कुटुंबात सामील होण्याची खूप इच्छा होती त्यामुळे मी माझे आडनाव भोसले केले आहे. कारण माझी लहान बहीण पण भोसले आहे. त्यामुळे सुगंधा दीदीच्या खूप जवळची आहे.” या व्हिडिओमध्ये सुगंधा नवरीच्या वेशात आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “दीदीपासून भोसले बनण्यापर्यंतचा प्रवास.”
सुगंधाने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांपेक्षाही जास्त वेळा पाहिले गेले आहे. नेहा कक्कर, गौहर खान यांनी या व्हिडिओवर कमेंट देखील केली आहे. शंकर महादेवन यांचा मुलगा शिवम महादेवन याने लिहिले आहे की, “हाहाहा खूपच छान.” सुगंधाचा पती संकेत भोसलेने कमेंट केली आहे की, “नमस्कार.” यावर सुगंधाने रिप्लाय देत लिहिले आहे की, “धन्यवाद भोसले साहेब.”
काही दिवसांपूर्वी संकेतचा वाढदिवस झाला आहे. संकेतचा लग्नानंतरचा हा पहिला वाढदिवस सुगंधाने खूप चांगला साजरा केला आहे. तिने तिची पूर्ण खोली सजवली होती. तसेच त्या दोघांचा फोटो असलेला केक तिने आणला होता. त्यांचे हे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
सुगंधा आणि संकेतने 26 एप्रिलला लग्न केले. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, त्यांनी केवळ 20-25 माणसांच्या उपस्थितीत लग्न केले आहे. ते त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सुगंधाने लग्नानंतर पहिल्यांदा स्वयंपाक घरात सगळ्यासाठी पंजिरी नावाचा पदार्थ केला होता. तो सर्वांना खूप आवडला होता. सुगंधा महाराष्ट्रीयन पदार्थ देखील शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा १६ वर्षीय जन्नत झुबेरच्या किसींग सीनवर भडकली होती आई, वडिलांनी दिली होती अशी प्रतिक्रिया