‘आपकी अदाए तौबा तौबा’, सुष्मिता सेनच्या वहिनीचे सिझलिंग फोटो पाहून चाहत्याची लक्षवेधी कमेंट, तुम्हीही घ्या पाहून

Sushmita Sen's sister in low Charu Asopa photo viral on social media


अभिनेत्री सुष्मिता सेनची वहिनी आणि टीव्ही मालिकांमधील गाजलेली अभिनेत्री म्हणजे चारू असोपा ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. चारूचे लग्न सुष्मिताचा भाऊ राजीव सोबत झाले आहे. ती सोशल मीडियावरील वापरामुळे तर खूपच प्रसिद्ध झाली आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर शेअर करत असते.

चारूचे काही सिझलिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, चारूने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने हे फोटोशूट एका गार्डनमध्ये केले आहे. तिच्या या ड्रेसमधील पोझ पाहण्यासारख्या आहेत.

चारूने हे फोटो शेअर करून लिहिले आहे की, “जांभळा रंग एक समाधान देतो.” तिच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी कमेंट करून तिच्या ड्रेसचे आणि तिचे भरभरून कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले आहे की, “आपकी अदाए तौबा तौबा.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहेकी, “हा रंग तुला खूपच सुंदर दिसत आहे.” तिच्या या फोटोवर अनेकजण हार्ट आणि फायरची ईमोजी पोस्ट करून त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत.

चारूने याआधी लाल रंगाची बिकिनी घालून फोटो शेअर केले होते. या सोबतच तेथील जागा देखील खूप सुंदर होती. हे फोटो तेव्हाचे होते, जेव्हा ती तिचा पती राजीव सोबत सुट्ट्या एंजॉय करायला गेली होती. तिच्या या फोटोला देखील प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता. चारूने सब टीव्हीवरील ‘बालवीर’, ‘मेरे आंगन मे’, ‘जिजा मा’यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण…’, म्हणत कपिल शर्माने शेअर केला २३ वर्ष जुना फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

-स्वत: शाहरुख खानने मुलगा आर्यनला घरात विना शर्ट फिरण्यावर घातली होती बंदी, कारण जाणून तुम्हीही म्हणाल, ‘योग्य निर्णय!’

-जेव्हा १६ वर्षीय जन्नत झुबेरच्या किसींग सीनवर भडकली होती आई, वडिलांनी दिली होती अशी प्रतिक्रिया


Leave A Reply

Your email address will not be published.